



Delhi Railway Station Stampede: शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेल्या महिन्याभरापासून महाकुंभमेळा सुरू असून, दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे.
ही चेंगराचेंगरी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर झाली. ही घटना, रात्री ९:५५ वाजता घडली. खरंतर, कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.या घटनेबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.”