“… तर विशेष गाड्यांतून प्रवास करणे परवडेल.” कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली ‘ही’ मागणी…

   Follow us on        
Konkan Railway: हंगामाच्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात काही विशेष गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा देते. कोकण रेल्वे मार्गावर गणेश चतुर्थी, होळी, उन्हाळी सुट्टी तसेच ईतर हंगामाच्या कालावधीत विशेष गाड्या चालविण्यात येतात. या गाड्यांचा तिकीटदर नियमित गाड्यांच्या तिकीट दरापेक्षा जास्त असतो. काही स्थानकांदरम्यान हा दर दुपटी पेक्षा जास्त असतो. कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविताना प्रवाशांना परवडेल अशा प्रकारे त्यांचे नियोजन करावे अशी विनंती केली आहे.
विशेष गाड्यांसाठी  २०१५ साली जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नुसार या गाडय़ांचे तिकीटदर आकारले जातात.या नियमावली नुसार विशेष गाड्यांना तिकीटदरा व्यतिरिक्त  सेकंड क्लास श्रेणी साठी १०% तर ईतर श्रेणी करिता ३०% अतिरिक्त दर आकारले जातात.
अतिरिक्त तिकीट दर आकारणीची किमान आणि कमाल मर्यादा खालील टेबल नुसार आहे.
तसेच या विशेष गाड्यांच्या  तिकीटदरांसाठी किमान प्रवास अंतर ठरविण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे
या नियमावलीनुसार मुंबई ते माणगाव किंवा खेड प्रवास करणाऱ्या प्रवाशाला स्लीपर श्रेणी च्या डब्यातून प्रवास करण्यासाठी 500 किलोमीटर प्रवासाचे पैसे द्यावे लागत आहेत. कारण नियमावली नुसार स्लीपर श्रेणीच्या तिकीटदरांसाठी  किमान प्रवास अंतर ५०० किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही १०० किलोमीटर प्रवासाचे आरक्षण करायला गेलात तरी तुम्हाला ५०० किलोमीटरप्रमाणे तिकीट दर द्यावाच लागणार आहे. या कारणाने कमी अंतराच्या प्रवासासाठी विशेष गाड्यांचा तिकिटदर दुपटी पेक्षा जास्त वाढतो.
CSMT to KHED Fare for Regular Train Fare for Special Train
Sleeper (SL) ₹ 190 ₹ 385
Three Tier AC (3A)
₹ 505 ₹ 1,050
Two Tier AC (2A) ₹ 710 ₹ 1,440
मात्र सेकंड सीटिंग (2S) आणि एसी चेअर कार (CC) या साठी किमान अंतर अनुक्रमे 100 आणि 250 एवढे आहे. त्यामुळे कमी अंतरासाठी विशेष गाड्यांचा तिकीटदरांत नियमित गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये मोठा फरक नसतो. त्यामुळे मुंबई ते खेड, चिपळूण, रत्नागिरीसाठी स्लीपर क्लास आणि त्यावरील श्रेणीच्या गाड्या न चालविता सेकंड सीटिंग (2S) आणि एसी चेअर कार (CC) या श्रेणीचे डबे असलेल्या गाड्या चालविण्यात याव्यात अशी विनंती कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी समितीच्या वतीने ईमेल द्वारे रेल्वे प्रशासनला केले आहे.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search