Konakn Railway:यंदा होळी सण साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणकरांसाठी एक खुशखबर आहे. होळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे
१) गाडी क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी- मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी विशेष:
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. विशेष ही गाडी गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी मुंबई सीएसएमटी येथून ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३:३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. .
गाडी क्र. ०११५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी स्पेशल ही गाडी गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी मडगाव जंक्शन येथून १४:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना: एकूण २४ कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, कंपोझिट (फर्स्ट एसी + टू टायर एसी) – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – १० कोच, स्लीपर – ०४ कोच, जनरल – ०४ कोच, एसएलआर ०२
२) गाडी क्र. ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) विशेष:
गाडी क्र. ०११२९ लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. ही विशेष गाडी गुरुवार दिनांक १३/०३/२०२५ आणि २०/०३/२०२५ रोजी २२:१५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून विशेष सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:45 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्र. ०११३० मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) विशेष ही गाडी शुक्रवार दिनांक १४/०३/२०२५ आणि २१/०३/२०२५ रोजी १३:४० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ०४:०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकावर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ .
गाडी क्रमांक ०११५२ आणि ०११३० या गाड्यांचे आरक्षण दिनांक २४/०२/२०२५ रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
Facebook Comments Box