मुंबई : राज्यातील अनेक पर्यटन ठिकाणांना दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आबालवृद्धांना भेट देणे कठीण होते. यावर उपाय म्हणून राज्यसरकारने या ठिकाणांवर केंद्र सरकारच्या साथीने राज्यात ४५ रोप-वे उभारण्यास मान्यता दिली आहे. या रोपवे मधील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे उभारण्यात येतील. राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. यांच्याबरोबरीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे.
केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेअंतर्गत एकूण ४५ रोप-वेची कामे हाती घेण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली. राज्य सरकारकडून १६, तर ‘एनएचएलएमएल’कडून २९ रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. यातील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे असतील.
रोप-वेची उभारणी करताना विविध पर्यायांचा वापर करण्यात येणार असून, त्यात ‘एनएचएलएमएल’ला राज्य सरकारने जागा उपलब्ध करून देणे, ‘एनएचएलएमएल’ला जागा उपलब्ध करून त्यात समभाग घेऊन महसूल मिळवणे, राज्य सरकारकडून खासगी-सार्वजनिक प्रकल्पाच्या आधारावर उभारणी करणे आणि बांधा-वापरा-हस्तांतरित करा या मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे.
प्रगतीपथावरील प्रकल्प
■ हाजीमलंग, कल्याण फनिक्युलर ट्रॉली सार्वजनिक बांधकाम विभाग (पीपीपी)
■ रेणुकामाता मंदिर, माहुरगड, नांदेड सा. बां. विभाग (सीआरआयएफ) प्रगतिपथावर
■ सिंहगड रोप-वे खासगी विकासक
■ जेजुरी रोप-वे – खासगी विकासक
प्रस्तावित प्रकल्प कोकण विभाग
■ रायगड किल्ला सा. बां. विभाग –
■ माथेरान एमएमआरडीए
■ कणकेश्वर, अलिबाग जिल्हा परिषद, रायगड
■ बाणकोट किल्ला, मंडणगड एनएचएलएमएल
■केशवराज (विष्णू) मंदिर, दापोली एनएचएलएमएल
■ महादेवगड पॉइंट, सावंतवाडी एनएचएलएमएल
■ माहुली गड, शहापूर- एनएचएलएमएल
■ सनसेट पॉइंट, जव्हार – एनएचएलएमएल
■ गोवा किल्ला, दापोली – एनएचएलएमएल
■ अलिबाग चौपाटी ते किल्ला नगर परिषद,
■ अलिबाग घारापुरी, एलिफंटा लेणी जिल्हा परिषद रायगड
Facebook Comments Box
Related posts:
Video: रत्नागिरी रेल्वे स्थानकात पावसामुळे पीव्हीसी शीट निघून लोंबकळण्याचा प्रकार; कोकण रेल्वे स्थान...
कोकण
Konkan Railway: सावधान! डाउन करणार्या प्रवाशांमुळे ठाणे-दादर स्थानकांवर दुर्घटना होण्याची शक्यता...
कोकण
मुंबई गोवा महामार्ग यावर्षीचीही 'डेडलाईन' चुकविणार? जनआक्रोश समितीने महामार्गावरील अपूर्ण कामांची या...
कोकण