



महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग इथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे . याठिकाणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसटीवर हल्ला करून चालकाला मारहाण केल्याची तसेच काळेही फासल्याची बातमी समोर आली आहे.
कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग इथे हा धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसटीवर हल्ला केला, तसेच काळेही फासले.
कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येथे का अशी विचारणा करत मारहाणही केली. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याने त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरु केले आहे. तसेच राज्य सरकारनेही याप्रकरणाची दखल घेत कर्नाटकला जाणाऱ्या बसेस तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.