आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 12:50:44 पर्यंत
- नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 18:32:04 पर्यंत
- करण-तैतुल – 12:50:44 पर्यंत, गर – 24:05:58 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-व्यतापता – 08:14:38 पर्यंत, वरियान – 29:50:33 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 07:03
- सूर्यास्त- 18:41
- चन्द्र-राशि-मकर
- चंद्रोदय- 29:41:59
- चंद्रास्त- 16:04:59
- ऋतु- वसंत
महत्त्वाच्या घटना :
- 1510: पोर्तुगीज सरदार आल्फोन्सो आल्बुकर्क याने पणजीचा किल्ला जिंकला.
- 1818: लेफ्टनंट कर्नल डिफेनने चाकणचा किल्ला उद्ध्वस्त केला. ब्रिटिशांनी दख्खनचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी सह्याद्रीतील बहुतेक किल्ले उद्ध्वस्त केले.
- 1935: मुंबई-नागपूर-जमशेदपूर मार्गावर फॉक्स मॉथ विमानाने हवाई टपाल सेवा सुरू केली.
- 1945: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू जहाजांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
- 1945: दुसरे महायुद्ध – तुर्कीने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले.
- 1968: मोहम्मद हिदायतुल्ला यांनी भारताचे 11 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 1988: पहिल्या भारतीय बनावटीच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1884: ‘रविशंकर व्यास’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म.
- 1940: ‘विनायक कोंडदेव ओक’ – बालवाङ्मयकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1914)
- 1943: ‘जॉर्ज हॅरिसन’ – बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 29 नोव्हेंबर 2001)
- 1948: ‘डॅनी डेंग्झोप्पा’ – चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
- 1974: ‘दिव्या भारती’ – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 1993)
- 1778: ‘जोस डे सान मार्टिन’ – पेरू देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 ऑगस्ट 1850)
- 1981: ‘शाहिद कपूर’ – चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1599: ‘संत एकनाथ’ – यांचे निधन.
- 1964: ‘शांता आपटे’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.
- 1978: ‘डॉ. प. ल. वैद्य’ – प्राच्यविद्यासंशोधक यांचे निधन. (जन्म: 29 जून 1891)
- 1980: ‘गिरजाबाई महादेव केळकर’ – लेखिका व नाटककार यांचे निधन.
- 1999: ‘ग्लेन सीबोर्ग’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 19 एप्रिल 1912)
- 2001: ‘सर डोनाल्ड ब्रॅडमन’ – ऑस्ट्रेलियन फलंदाज यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1908)
- 2016: ‘भवरलाल जैन’ – भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1937)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box