Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,
गाडी क्र. ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष:
गाडी क्र. ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुअनंतपुरम उत्तर वीकली विशेष ही विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी १६;०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुअनंतपुरम उत्तरला पोहोचेल.
गाडी क्र. ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ही विशेष गाडी तिरुअनंतपुरम उत्तर येथून शनिवार, दिनांक ०८/०३/२०२५ आणि १५/०३/२०२५ रोजी १६:२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक (टी) येथे तिसऱ्या दिवशी ००:४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका, सुरेंद्र रोड, सुरेंद्र रोड, उंबरनाथ रोड मंगळुरू जं, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकावर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण 22 एलएचबी कोच: टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Facebook Comments Box