



Megablock on Central Railway: मुंबई सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या कामासाठी मध्यरेल्वे या स्थानकावर या आठवड्यात एक ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या स्थानकावरून सुटणार्या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाड्यांचा समावेश असून याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे.
आरंभ स्थानकांमध्ये बदल करण्यात आलेल्या गाड्या
दिनांक ०१ मार्च रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावरून या स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु जाणार आहे.
दिनांक ०२ मार्च रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२२२९ मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२११९ मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस या गाड्या दादरवरून या स्थानकावरील नियोजित वेळेत आपला प्रवास सुरु करणार आहेत. तर गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल स्थानकावरून पनवेल स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु करणार आहे.
अंतिम स्थानकांत बदल करण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२०५२ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास दिनांक २६ फेब्रुवारी ते ०१ मार्च दरम्यान दादरला तर गाडी क्रमांक १२१३४ मंगलोर मुंबई एक्सप्रेस या गाडीचा प्रवास ठाण्याला संपविण्यात येणार आहे.
दिनांक ०१ मार्च रोजी गाडी क्रमांक २०११२ मडगाव -सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०१०४ मडगाव -सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस-या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.