



Shaktipeeth Expressway Updates:राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या पवनार पत्रादेवी (नागपूर – गोवा) महामार्गा संबधित एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, आजरा, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकर्यांनी सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या 5 पट बाजारभाव मोबदल्याच्या बदल्यात पवनार पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला पाठिंबा दर्शवला आहे.
प्रत्यक्षात भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी यापूर्वीच अधिकाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र दिले असून त्यांनी या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष विकास पॅकेजची मागणी केली आहे.
पवनार – पत्रादेवी एक्स्प्रेस वे ८०२ किलोमीटर लांबीचा आहे. या द्रुतगती मार्गाला सहा लेन कॉरिडॉर आहेत. नागपूर आणि गोवा यांना जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग हा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.