तुतारी एक्सप्रेससह राज्यातील एकूण ११ एक्सप्रेस गाडयांना ‘एलएचबी कोच’ जोडणे गरजेचे

 

LHBfication of Trains:रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढवा यासाठी रेल्वे प्रशासन जुन्या प्रकारातील, पारंपरिक पद्धतीमधील डब्यांऐवजी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षित असलेले ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र महाराष्ट्र राज्यातील काही महत्वाच्या गाड्या ज्यांना आधुकीकरण करण्याची खरी गरज असताना अजूनही जुन्या प्रकारातील आयसीएफ रेक सह चालविण्यात येत आहेत.
कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना अनेकदा पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये कमी प्राधान्य दिले असल्याचा आरोपही समितीने केला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी  ई-मेल द्वारे या एक्सप्रेस गाड्यांची यादी प्रशासनाला पाठवली असून या गाड्यांचे रूपांतर लवकरात लवकर एलएचबी स्वरूपात करावे अशी मागणी केली आहे.

कोणत्या आहेत या गाड्या?

  • ११००३/११००४  दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (२ रेक)
  • ११०२९/११०३०  कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस (३ रेक)
  • ११०३९/११०४०  कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस / ०१०२३/०१०२४ कोल्हापूर – पुणे एक्सप्रेस (५ रेक)
  • १७६१७/१७६१८ नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस / १७६८७/१७६८८ मराठवाडा एक्सप्रेस (३ रेक)
  • १७६११/१७६१२ नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (२ रेक)
  • २२१५५/२२१५६ कोल्हापूर – कलबुर्गी एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०१/११४०२ (०१.०३.२०२५ पासून ११००१/११००२ या नावाने पुनर्क्रमित करा) मुंबई – बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस (3 रेक)
  • ११०२७/११०२८ दादर – सातारा एक्सप्रेस (पुणे-पंढरपूर मार्गे) / ११०४१/११०४२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (पुणे मार्गे) (2 रेक)
  • १२१३१/१२१३२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) / २२१४७/२२१४८ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) (१ रेक)
  • ०११३९/०११४० नागपूर – मडगाव एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०३/११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस (१ रेक)
या गाड्या मध्य आणि दक्षिण रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहेत. या गाड्यांचे महत्व आणि प्रवाशांकडून होणारी गर्दी पाहता या गाडयांना ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्यात यावेत अशी समितीने मागणी  केली आहे.
Facebook Comments Box

2 thoughts on “तुतारी एक्सप्रेससह राज्यातील एकूण ११ एक्सप्रेस गाडयांना ‘एलएचबी कोच’ जोडणे गरजेचे

  1. Pramod says:

    तुतारी एक्सप्रेस ची सकाळची परतीची फेरी सुरु करा. कोकणकन्या ज्या प्रकारे २ तासात मुंबई हुन मडगाव साठी परत जाते. तुतारी एक्सप्रेस सावंतवाडी हुन मुंबईसाठी दुपारी १:०० च्या दरम्यान मुंबई साठी निघाली पाहिजे.
    कोकण रेल्वे खूप उत्पन्न गाडी सावंतवाडी टर्मिनस वर दिवसभर उभी करून ठेवल्यामुळे गमावत आहे.

  2. Pramod S says:

    मडगाव -CSMT मांडवी एक्सप्रेस CSMT स्टेशन वर १०:३० chya दरम्यान पोहोचून, रात्री ११:३० ला कोकणकन्या एक्सप्रेस नावाने मडगाव साठी परत जाते.
    याच प्रमाणे तुतारी एक्सप्रेस चा परतीची फेरी ka होत नाही?? सकाळी१०:३० la Sawantwadi येथे पोहोचलेली गाडी दिवसभर सायडिंगला उभी करून रात्री ८:०० la मुंबई साठी परत जाते. ती सकाळीच सफाई, दुरुस्ती करून १:०० च्या दरम्यान सावंतवाडी येथून का सोडत नाहीत?? ही गाडी ११:०० chya दरम्यान मुंबई la पोहोचु शकते.
    कोकण रेल्वे खूप उत्पन्न गमावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search