केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रर फडणवीस यांनी दिली आहे.
असे करताना महायुती सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे.संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील. अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे.
Facebook Comments Box