सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानक हे तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणी कोकणवासी आणि पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. येथील स्थानक टर्मिनस घोषित होऊन तब्बल दहा वर्षे उलटली परंतु हे काम देखील गेली अनेक वर्षे रखडले आहे. ह्या स्थानकातून कोरोना काळात एकूण सहा गाड्या काढून घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या संघटनेने या बद्दल अनेक वेळा आवाज उठवला असून या ठिकाणी तब्बल तीन वेळा आंदोलन देखील केले होते, आताच २६ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील जनतेने घेतली होती. तरी देखील कोकण रेल्वे प्रशासनाकडून याची योग्य दखल घेण्यात आली नाही असेच या वरून दिसते.
सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या ह्या रेल्वे बोर्डाच्या मानकापेक्षा अधिक असून देखील येथे थांबे न देण्यामागे कोकण रेल्वे प्रशासनाचे काय हित आहे हे मात्र अनुत्तरित आहे.या वर्षात आधी रोहा आणि आता कुमठा येथे नवीन थांबे मंजूर झाले परंतु सावंतवाडी स्थानकात काढून घेण्यात आलेले थांबे पुन्हा देण्यात रेल्वे प्रशासन एवढा आखडता हात का घेत आहे हा प्रश्न सामान्य कोकणकर जनतेला पडला आहे.
कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या १२२३१ /३२ त्रिवेंद्रम – निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस, १२२०/०२ एल टी टी – कोचुवेली – एल टी टी गरीब रथ एक्सप्रेस या गडांचा थांबा अजूनही पूर्ववत केला गेला आहे. त्याबरोचर मुंबई सीएसएमटी – मंगलोर या गाडीला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा या मागणीलाही वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी येथे थांबा मिळणे अपेक्षित होते. मात्र तिथेही या स्थानकाला डावलले गेले आहे. कोकण रेल्वे प्रशासन जर असेच करणार असेल तर पुन्हा महाराष्ट्र दिनी भव्य रेल रोको करू असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने दिला आहे.
Facebook Comments Box
तुतारी एक्स्प्रेसची दिवसाची फेरीची चालू कारावी, सावंतवाडी स्टेशन वर दिवसभर सीडी ट्रॅक वर उभी असते.मेन्टेनन्स करुन ती चालवली गेली तर कोकण जनतेसाठी नवीन ट्रेन उपलब्ध होईल……