Konkan Railway: होळी उत्सव – २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ट्रेन क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल या गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.
१) गाडी क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल:
ट्रेन क्रमांक ०७३११ वास्को द गामा – पटना एक्सप्रेस स्पेशल मंगळवार, ११/०३/२०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता वास्को द गामा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०७३१२ पाटणा – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल शनिवार, १५/०३/२०२५ रोजी सायंकाळी ५:४० वाजता पाटणा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज , पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण २० एलएचबी कोच = दोन टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
Facebook Comments Box