Konkan Railway: रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेमार्गावरील कुमठा आणि कुंदापूरा या दोन स्थानकांवर प्रायोगिक तत्वावर थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. कुमठा येथे एक तर कुंदापूरा येथे दोन गाडयांना थांबे मंजूर करण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक २२४७६ कोइम्बतूर – हिसार एक्सप्रेस / गाडी क्रमांक २२४७५ हिसार – कोइम्बतूर एक्सप्रेस ही गाडी दिनांक १५ मार्च २०२५ पासून कुमठा या स्थानकावर थांबणार आहे.
तर गाडी क्रमांक २२६५३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस / गाडी क्रमांक २२६५४ एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी दिनांक १५ मार्च २०२५ पासून आणि गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम जंक्शन – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस / गाडी क्रमांक २२६५६ एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जंक्शन. एक्सप्रेस दिनांक १४ मार्च २०२५पासून कुंदापूरा या स्थानकावर थांबणार आहे.
थांबे मिळवून देण्यात खासदारांचे विशेष प्रयत्न
उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी कुमठा येथे थांबे मिळवण्यासाठी तर श्री कोटा पुजारी यांनी कुंदापूरा येथे थांबे मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
Facebook Comments Box