मुंबई: नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला सांगलीआणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. अधिवेशन सुरु असताना महामार्गाला विरोध करणारे शेतकरी आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. याबाबत विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग का गरजेचा आहे याची माहिती दिली.
हा महामार्ग सरकारचा अट्टाहास नाहीये तर, महाराष्ट्राच्या विकासाठी महत्वाचा महामार्ग आहे, समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग देखील विकासासाठी महत्वाचा मार्ग ठरेल असे फडणवीसम्हणाले. कोल्हापुरातून पाऊण ते एक तासांत मोपा विमानतळावर जाता येईल, यामुळे वाणिज्य क्षेत्रातलाभ होणार नाही का? परिवर्तन होणार नाही का? असे प्रश्न त्यांनी विचारलेत. महामार्गा विरोधात निघणाऱ्या मोर्चा सारखा महामार्गाला समर्थन देणारा मोर्चा शेतकरी काढणार आहेत, असे फडणवीस म्हणालेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देखील फडणवीस यांनी यावेळी दिले. नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना तसेच, त्याला जोडणारे इतर मार्ग असताना शक्तीपीठ कशासाठी? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला. शिवाय मोपाला जाण्यासाठी आजरामार्ग चौपदरीकरण झाल्याने दोन ते अडीच तासांत जाता येते असेही पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. आणि आंदोलन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी विनंती पाटील यांनी केली.
Facebook Comments Box