सिंधुदुर्ग:
गेले काही महिने चिपी विमानतळ मुंबई ते सिंधुदुर्ग बंद असेलेली विमानसेवा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. अलीकडेच खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची यांची भेट घेतली. मंत्री के.राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले आहे.

अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली होती. आरसीएस चा कालावधी ३ वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना मोठा लाभ होत होता. स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारि उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी. अशी भुमिका खा. राणे यांनी स्पष्ट केली. ही सेवा पुनः मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरु करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खा. नारायण राणे आग्रही आहेत.
Facebook Comments Box