महाराष्ट्र:-
मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र राज्यात मराठीचे महत्व कमी करून त्याजागी हिंदीचा वापर होत असल्याने मराठी भाषिक जनता दुखावली जात आहे. असाच एक प्रकार नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर घडला आहे.
या महामार्गाच्या फलकावरची नावे चक्क हिंदीत छापण्यात आली आहेत. उदाहरणार्थ जंबारगांवच्या जागी जंबारगाँव, करंजगावच्या जागी करंजगाँव तर हडस पिंपळगांवच्या जागी हडस पिंपलगाँव अशा नावाचे फलक लावण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत न येत तो राज्य सरकारच्या अखत्यारीत येत आहे. असे असूनही इथे मराठी भाषा डावलली जात असल्याने मराठी भाषिक जनता दुखावली गेली आहे. या महामार्गावरील सर्व फलकांवरची नावे ताबडतोब मराठीमध्ये करण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत आहे.
Facebook Comments Box