



Konkan Railway: उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी हंगाम – २०२५ मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०६०९७ / ०६०९८ इरोड जंक्शन – बारमेर – इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष:
गाडी क्रमांक ०६०९७ इरोड जंक्शन – बारमेर साप्ताहिक विशेष ही गाडी दर मंगळवारी, ०८/०४/२०२५ ते १०/०६/२०२५ पर्यंत इरोड जंक्शन येथून सकाळी ०६:२० वाजता सुटेल आणि गाडी तिसऱ्या दिवशी ०४:३० वाजता बारमेरला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०६०९८ बाडमेर – इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष ही गाडी दर शुक्रवारी, ११/०४/२०२५ ते १३/०६/२०२५ पर्यंत बाडमेरहून रात्री २२:५० वाजता सुटेल आणि इरोड जंक्शन येथे तिसऱ्या दिवशी २०:१५ वाजता पोहोचेल.
ही गाडी तिरुपूर,पोदनूर जंक्शन, पलक्कड, शोरानूर जं., तिरूर. कोझिकोड, कन्नूर, कासारगोड, मंगळुरु जं., उडुपी, कुंदापूर, मुकांबिका रोड बयंदूर (एच), भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, अंकोला, कारवार, मडगाव जं., करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली , वैभववाडी रोड, राजापूर रोड. रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, भरुच जं., वडोदरा जं., नडियाद जं., साबरमती, भिलडी जं., राणीवरा, मारवाड भीनमाळ, मोदरण, जालोर, मोक्लधारी, जं. आणि बायतु स्टेशनला थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ कोच : थ्री टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १४ कोच, जनरल – ०४ कोच, एसएलआर – ०२.

Facebook Comments Box