०७ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 20:03:02 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-तैतुल – 07:39:45 पर्यंत, गर – 20:03:02 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-धृति – 18:18:03 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:22
  • सूर्यास्त- 18:52
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय-14:20:59
  • चंद्रास्त-27:37:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक आरोग्य दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1875 : आर्य समाजाची स्थापना झाली.
  • 1827 : जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता
  • 1906 : माउंट व्हेसुव्हियसचा उद्रेक होऊन नेपल्स शहराचा नाश झाला..
  • 1927 : AT&T अभियंता हर्बर्ट इव्हस यांनी पहिले लांब-अंतराचे सार्वजनिक दूरदर्शन प्रसारण (वॉशिंग्टन, डी.सी., वाणिज्य सचिव हर्बर्ट हूवर यांची प्रतिमा प्रदर्शित करून न्यूयॉर्क शहरापर्यंत) प्रसारित केले.
  • 1939 : दुसरे महायुद्ध – इटलीने अल्बेनियावर आक्रमण केले.
  • 1940 : पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
  • 1948 : जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
  • 1964 : आय.बी.एम. सिस्टम 360 ची घोषणा.
  • 1989 : लाथा नावाच्या विषारी दारूमुळे बडोद्यात 128 जणांचा मृत्यू झाला.
  • 1996 : श्रीलंकेचा क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्याने सिंगरकरंडक स्पर्धेत 17 चेंडूत विश्वविक्रमी अर्धशतक झळकावले.
  • 2022 : केतनजी ब्राउन जॅक्सनची युनायटेड स्टेट्सच्या सर्वोच्च न्यायालयासाठी पुष्टी झाली, ती पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्ती बनली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1506 : ‘सेंट फ्रान्सिस झेविअर’ – ख्रिस्ती धर्मप्रसारक यांचा जन्म. (मृत्यू: 3 डिसेंबर 1552)
  • 1770 : ‘विल्यम वर्डस्वर्थ’ – स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 1850)
  • 1860 : ‘विल केलॉग’ – केलॉग्ज चे मालक यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑक्टोबर 1951)
  • 1891 : ‘सर डेविड लो’ – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 19 सप्टेंबर 1963)
  • 1920 : ‘पंडित रविशंकर’ – भारतरत्‍न सतार वादक यांचा जन्म. (मृत्यू: 12 डिसेंबर 2012)
  • 1925 : ‘चतुरानन मिश्रा’ – केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 2011)
  • 1938 : ‘काशीराम राणा’ – भाजपाचे लोकसभा सदस्य यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 2012)
  • 1942 : ‘जितेंद्र’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1954 : ‘जॅकी चेन’ – हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1982 : ‘सोंजय दत्त’ – भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1498 : ‘चार्ल्स (आठवा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 30 जून 1470)
  • 1935 : ‘डॉ. शंकर आबाजी भिसे’ – भारतीय शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 29 एप्रिल 1867)
  • 1947 : ‘हेन्री फोर्ड’ – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 30 जुलै 1863)
  • 1977 : ‘राजा बढे’ – चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1912)
  • 2001 : गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा ‘डॉ. जी. एन. रामचंद्रन’ – जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1922)
  • 2004 : ‘केलुचरण महापात्रा’ – प्रसिद्ध ओडिसी नर्तक यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1926)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search