Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी – मडगाव वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एलटीटी – मडगाव एक्स्प्रेसचे या गाड्यांचे आरक्षण इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) या ऑनलाईन पोर्टल वर दाखवत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद ठेवण्यात येणार कि काय अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.
गाडी क्रमांक २२२२९ / २२२३० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२११९ / २२१२० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस यांसारख्या प्रीमियम रेल्वेगाड्यांसह गाडी क्रमांक ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे १५ जूननंतरचे आरक्षण करताना प्रवाशांना अडचणी येत आहे.
अनेक प्रवाशांनी आयआरसीटीसी संकेतस्थळावरून वंदे भारत, तेजस, एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी रेल्वेगाड्यांचे तिकीट काढावे लागत आहे. तसेच पावसाळ्यात कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस, एलटीटी – मडगाव एक्स्प्रेस धावणार की नाही याबाबत प्रवासी संभ्रमात आहेत.
या वर्षीच्या कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून अजून काही माहिती उपलब्ध झाली नाही आहे. तथापि, सामान्यतः कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत लागू केले जाते, कारण या काळात दरडी कोसळणे आणि पाणी साचणे यासारख्या समस्या उद्भवतात. या कालावधीत गाड्यांचा वेग कमी केला जातो, ज्यामुळे वेळापत्रकात बदल केले जातात
Facebook Comments Box
Related posts:
संगमेश्वर स्थानकावरील गैरसोयींकडे लक्ष वेधण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपतर्फे पाठ...
कोकण
Landslide on Railway Track: कोकणकन्या उशिराने, दिवा रत्नागिरी पॅसेंजर रद्द, मत्स्यगंधा व अन्य गाड्या...
कोकण
Voice Of Konkan | 'या' १५ एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा का नाही?
कोकण रेल्वे