Konkan Railway: अखेर ‘त्या’ तीन गाड्यांचे पावसाळी आरक्षण सुरु; फेऱ्यांमध्ये मात्र कपात

   Follow us on        
Konkan Railway News: दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. मात्र दोन महिन्याचे आगाऊ आरक्षण चालू झाले असताना त्यात वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि एलटीटी मडगाव एक्सप्रेस या गाड्यांची नावे दिसत नसल्याने आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या संभ्रम निर्माण झाला होता. या गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद राहणार कि काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसी संकेतस्थळावर दिसत असल्याने या शंकेचे निरसन झाले आहे. मात्र या गाड्यांच्या फेऱ्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
रेक्स च्या कमतरतेमुळे कपात
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search