New Railway Line:महाराष्ट्रात अजून एका नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. शनिशिंगणापूरला थेट रेल्वे नसल्याने राहुरी-शनिशिंगणापूर या नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देण्यात आली आहे. 22 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शनिशिंगणापूर हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. शनि दर्शनासाठी दररोज सुमारे 45 हजार भाविक दर्शनासाठी येतात.
शनिशिंगणापूर राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवाशातील मोहिनीराज मंदिर, पैस खांब यांसारख्या धार्मिक स्थळांना हा रेल्वे मार्ग सोयीस्कर होणार आहे. त्यातून परिसरात स्थानिक पर्यटनवाढ आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. दररोज चार रेल्वे या मार्गावर धावण्याचे प्रस्तावित असून, त्यातून वर्षाकाठी 18 लाख प्रवासी रेल्वे प्रवास करतील, असा अंदाज रेल्वे मंत्रालयाने वर्तविला आहे.
विकास आणि अध्यात्मिक केंद्र जोडण्यासाठी हा रेल्वेमार्ग एक दिशादर्शक असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकल्पाला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. तसेच केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली आहे.
Facebook Comments Box