आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 24:02:25 पर्यंत
- नक्षत्र-धनिष्ठा – 06:50:05 पर्यंत
- करण-भाव – 12:36:11 पर्यंत, बालव – 24:02:25 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-आयुष्मान – 16:13:45 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 06:11
- सूर्यास्त- 19:18
- चन्द्र-राशि-कुंभ
- चंद्रोदय- 22:06:00
- चंद्रास्त- 09:09:59
- ऋतु- वर्षा
महत्त्वाच्या घटना :
- 1789 : पॅरिसमध्ये, नागरिकांनी फ्रेंच राज्याच्या दडपशाहीचे प्रतीक असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आणि आतील सात कैद्यांची सुटका केली. हि घटना फ्रेंच राज्यक्रांतीत फार महत्वाची मानली जाते.
- 1867 : अल्फ्रेड नोबेल यांनी स्फोटक डायनामाइटची यशस्वी चाचणी केली.
- 1925 : जर्मनीमध्ये नाझी पक्ष वगळता सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली.
- 1942 : काँग्रेसच्या वर्धा अधिवेशनात, “भारत छोडो” ठराव मंजूर करण्यात आला, महात्मा गांधींना ब्रिटनपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोहीम करण्यास अधिकृत केले.
- 1958 : इराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेत.
- 1960 : ‘जेन गुडॉल’ यांनी चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी टांझानियामधील एका अभयारण्यात प्रवेश केला. त्यांनी 45 वर्षे संशोधन केले.
- 1969 : अमेरिकेने चलनातून $500, $1,000, $5,000 आणि $10,000 च्या नोटा काढून घेतल्या.
- 1976 : कॅनडामध्ये मृत्युदंडावर बंदी घालण्यात आली.
- 2003 : संदीप चंदा यांना जागतिक बुद्धिबळ महासंघाकडून ग्रँडमास्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2013 : पोस्टल विभागाची 160 वर्षे जुनी तार सेवा बंद करण्यात आली
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1856 : ‘गोपाल गणेश आगरकर’ – थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 17 जून 1895)
- 1862 : ‘गुस्टाफ क्लिम्ट’ – ऑस्ट्रियन चित्रकार यांचा जन्म.
- 1884 : ‘यशवंत खुशाल देशपांडे’ – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 20 नोव्हेंबर 1970)
- 1893 : ‘गारिमेला सत्यनारायण’ – भारतीय कवी आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 18 डिसेंबर 1952)
- 1910 : ‘विल्यम हॅना’ – टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार यांचा जन्म.
- 1917 : ‘रोशनलाल नागरथ’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 16 नोव्हेंबर 1967)
- 1920 : ‘शंकरराव चव्हाण’ – केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 2004)
- 1947 : ‘नवीन रामगुलाम’ – मॉरिशसचे तिसरे व सहावे पंतप्रधान यांचा जन्म.
- 1957 : ‘आलोक कुमार वर्मा’ – भारतातील केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे(सी.बी.आय.)माजी संचालक यांचा जन्म.
- 1967 : ‘हशन तिलकरत्ने’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1904 : ‘पॉल क्रुगर’ – दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी यांचे निधन.
- 1936 : ‘धनगोपाळ मुखर्जी’ – भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1890)
- 1963 : ‘स्वामी शिवानंद सरस्वती’ – योगी व आध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 8 सप्टेंबर 1887)
- 1975 : ‘मदनमोहन’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 25 जून 1924)
- 1993 : ‘श्रीमंत विजयमाला राणीसाहेब’ – करवीर संस्थानच्या महाराणी यांचे निधन.
- 1998 : ‘रिचर्ड मॅकडोनाल्ड’ – मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 16 फेब्रुवारी 1909)
- 2003 : ‘लीला चिटणीस’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 9 सप्टेंबर 1909)
- 2003 : ‘प्रो. राजेंद्र सिंग’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 4 थे सरसंघचालक यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1922)
- 2008 : ‘यशवंत विष्णू चंद्रचूड’ – सर्वोच्च न्यायालयाचे 16 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म : 12 जुलै 1920)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box