आजचे पंचांग
- तिथि-दशमी – 12:15:18 पर्यंत
- नक्षत्र-कृत्तिका – 22:54:12 पर्यंत
- करण-विष्टि – 12:15:18 पर्यंत, भाव – 22:58:34 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-गण्ड – 21:47:50 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:14
- सूर्यास्त- 19:16
- चन्द्र-राशि-मेष – 06:12:45 पर्यंत
- चंद्रोदय- 26:18:00
- चंद्रास्त- 15:05:00
- ऋतु- वर्षा
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस
- जागतिक बुद्धिबळ दिन
महत्त्वाच्या घटना :
- 1296 : अलाउद्दीन खिलजीने स्वतःला दिल्लीचा सुलतान घोषित केले
- 1402 : तैमूर लँगने तुर्कीमधील अंकारा शहर जिंकले.
- 1807 : निसेफोरस निपसला जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट देण्यात आले.
- 1828 : मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
- 1871 : ब्रिटिश कोलंबिया प्रांत कॅनडामध्ये विलीन झाला.
- 1903 : फोर्ड मोटर कंपनीकडून पहिली ऑटोमोबाईल आणली गेली.
- 1908 : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली.
- 1921 : न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान हवाई मेल सेवा सुरू झाली.
- 1926 : मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
- 1944 : दुसरे महायुद्ध – क्लॉस फॉन स्टॉफेनबर्गने केलेल्या हत्येच्या प्रयत्नात ॲडॉल्फ हिटलर वाचला.
- 1949 : इस्रायल आणि सीरियाने शांतता करारावर स्वाक्षरी करून 19 महिन्यांचे युद्ध संपवले.
- 1952 : फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे 15 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
- 1960 : सिरिमावो बंदरनायके श्रीलंकेचे पंतप्रधान झाले.
- 1969 : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर चालणारा पहिला माणूस बनला.
- 1973 : केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस केनो यांनी घोषणा केली की देशातील आशियाई व्यवसाय वर्षाच्या अखेरीस बंद करण्यास भाग पाडले जातील.
- 1976 : पहिले मानवरहित अंतराळयान वायकिंग-1 मंगळावर उतरले
- 1989 : म्यानमार सरकारने आँग सान स्यू की यांना नजरकैदेत ठेवले.
- 2000 : अभिनेते दिलीप कुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
- 2015 : अमेरिका आणि क्युबा यांनी पाच दशकांनंतर राजनैतिक संबंध पुन्हा सुरू केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 356 : 356ई.पूर्व : ‘अलेक्झांडर द ग्रेट’ – मॅसेडोनियाचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून ख्रिस्त पूर्व 323)
- 1822 : ‘ग्रेगोर मेंडेल’ – जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 6 जानेवारी 1884)
- 1836 : ‘सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट’ – ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 1925 – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)
- 1889 : ‘जॉन रीथ’ – बीबीसी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1971)
- 1911 : ‘बाका जिलानी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- 1919 : ‘सर एडमंड हिलरी’ – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक यांचा जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 2008)
- 1921 : ‘पंडित सामताप्रसाद’ – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1994)
- 1929 : ‘राजेंद्रकुमार’ – हिन्दी चित्रपट अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 12 जुलै 1999)
- 1976 : ‘देबाशिष मोहंती’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1922 : ‘आंद्रे मार्कोव्ह’ – रशियन गणितज्ञ यांचे निधन.
- 1937 : ‘गुग्लिएल्मो मार्कोनी’ – रेडिओचे संशोधक यांचे निधन. (जन्म : 25 एप्रिल 1874)
- 1943 : ‘वामन मल्हार जोशी’ – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1882)
- 1951 : ‘अब्दुल्ला (पहिला)’ – जॉर्डनचा राजा यांचे निधन.
- 1965 : ‘बटुकेश्वर दत्त’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 18 नोव्हेंबर 1910)
- 1972 : ‘गीता दत्त’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 23 नोव्हेंबर 1930)
- 1973 : ‘ब्रूस ली’ – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1940)
- 1995 : ‘शंकरराव बोडस’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 4 डिसेंबर 1935)
- 2013 : ‘खुर्शिद आलम खान’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1919)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box