



ही सेवा येत्या २३ ऑगस्टपासून सुरू होणार असून, यासाठीचे आरक्षण २१ जुलै २०२५ पासून खुले होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी खर्या अर्थाने ’चिंतामुक्त’ प्रवासाचा अनुभव देणारा ठरेल.
प्रवास भाडे
सुरवातीला कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दोन्ही बाजूने फक्त अंतिम स्थानकांकरिता ही सेवा सुरु केली जाणार आहे. या सेवेसाठी प्रत्येक कारसाठी शुल्क ७ हजार ८७५ रुपये असणार असून बुकिंग करताना ४००० रुपये ( नोंदणी शुल्क) घेतले जाणार आहेत. उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी जमा करावी लागणार आहे. कारसोबत त्याच गाडीमध्ये तिघांना प्रवास करता येणार आहे. दोन प्रवाशांना ३ टायर एसी कोच मध्ये प्रति प्रवासी ९३५ रुपये तिकीट रक्कम आकारण्यात येणार आहे. तिसरा प्रवासी असल्यास त्यास स्लीपर कोच मध्ये सेकंड सीटिंगच्या प्रवास भाड्यात म्हणजे १९० रुपये आकारून प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. जर काही अतिरिक्त प्रवासी असतील त्यांना कोचमध्ये रिकाम्या जागा असतील तरच परवानगी दिली जाईल. त्यासाठी रेल्वे प्रशासन बांधील असणार नाही. प्रवासाच्या दिवशी, ग्राहकाने प्रस्थान वेळेच्या आधी दुपारी २:०० वाजेपर्यंत उपस्थित राहावे आणि मालवाहतुकीची उर्वरित रक्कम स्टेशनवर भरावी. जर प्रवासी आले नाहीत तर नोंदणी शुल्क जप्त केले जाईल
प्रवासाची वेळ
ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान उपलब्ध असेल. या सेवेची सुरुवात कोलाड (महाराष्ट्र) येथून २३ ऑगस्ट २०२५ पासून तर वेर्णा (गोवा) येथून २४ ऑगस्ट २०२५ पासून होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता ही गाडी गोव्याच्या दिशेनं रवाना होणार असून ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता वेर्णा येथे पोहचेल. परतीच्या प्रवासातही ती वेर्णा येथून संध्याकाळी ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता कोलाड येथे पोहोचेल. प्रवाशांना मात्र तीन तास अगोदर म्हणजे दुपारी २ वाजता आरंभ स्थानकांवर पोहचणे गरजेचे आहे.
सेवा कधीपासून सुरू?
– कोलाड (महाराष्ट्र) येथून: 23 ऑगस्ट 2025 पासून.
– वेर्णा (गोवा) येथून: 24 ऑगस्ट 2025 पासून.
– ही सेवा 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहील.
ही सेवा खालील दिवशी उपलब्ध असणार आहे.
आरक्षण कधी आणि कसे?
-बुकिंग सुरू: 21 जुलै 2025.
-बुकिंगची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025.
कोलाड-वेर्णा सेवेसाठी संपर्क
मुख्य वाणिज्य व्यवस्थापक यांचे कार्यालय
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
४था मजला, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई ४०० ६१४.
संपर्क क्रमांक ९००४४७०९७३
वेर्णा-कोलाड सेवेसाठी संपर्क
वेर्णा रेल्वे स्टेशन
वेर्णा, गोवा
संपर्क क्रमांक ९६८६६५६१६०
…तर प्रवास रद्द होईल
प्रत्येक ट्रिपची कमाल क्षमता ४० कारची असेल. रेकमध्ये २० वॅगन असतील आणि प्रत्येक वॅगनमध्ये दोन कार असतील. जर प्रत्येक ट्रिपमध्ये १६ कारपेक्षा कमी बुकिंग झाली तर त्यादिवसाची सेवा रद्द केली जाईल. अशा परिस्थितीत, ग्राहकाने भरलेले नोंदणी शुल्क कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून परत केले जाईल.
एकदा सेवा बुक केल्यानंतर रद्द करण्याची परवानगी नाही. जर केआरसीएल द्वारे सेवा चालवल्या जात नसतील, तर ग्राहकाने भरलेले नोंदणी शुल्क बुकिंगच्या वेळी ग्राहकाने दिलेल्या बँक खात्यात परत केले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
(i) आधार कार्डची प्रत
(ii) पॅन कार्डची प्रत
(iii) गाडीच्या आरसी बुक/कार्डची प्रत
(iv) गाडीच्या वैध विम्याची प्रत
-मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून सुटका.
– प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत.
– लांबच्या प्रवासात गाडी चालवण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाचणार.
– कोकणात किंवा गोव्यात फिरण्यासाठी स्वतःची गाडी उपलब्ध. या सेवेच्या अधिक माहितीसाठी, www.konkanrailway.com ला भेट द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.