



Railway Updates: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून ह. निजामुद्दीन (दिल्ली) ते एर्नाकुलम (केरळ) दरम्यान चालणाऱ्या ‘दुरंतो एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १२२८४ / १२२८३) मध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डब्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
लांब पल्ल्याची ही गाडी साप्ताहिक स्वरूपात धावत कोकण रेल्वे मार्गे जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणी लक्षात घेता, डब्यांची रचना पुढीलप्रमाणे बदलण्यात येत आहे:
👆🏻आपला स्पॉट आजच बुक करा आणि उत्तम प्रतिसाद मिळवा
सध्याची कोच रचना (एकूण १९ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०३
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१
सुधारित कोच रचना (एकूण २२ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०६ (पूर्वीपेक्षा ३ डब्यांनी वाढ)
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१
यामुळे प्रवाशांना विशेषतः स्लीपर प्रवर्गात अधिक जागा उपलब्ध होणार आहे.
सुधारित कोच रचना लागू होण्याच्या तारखा:
गाडी क्र. १२२८४ (ह. निजामुद्दीन – एर्नाकुलम) : दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ पासून
गाडी क्र. १२२८३ (एर्नाकुलम – ह. निजामुद्दीन) : दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पासून
गाडीच्या मार्गातील थांबे, वेळापत्रक आणि इतर तपशीलांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES (National Train Enquiry System) मोबाईल अॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी याबदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.