सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७३ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

ऑनलाईन अर्ज ५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जाणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्गमध्ये लिपिक पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे. बँकेच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखालील लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार असून, यासाठीची प्रक्रिया आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे.


📌 महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात : ५ सप्टेंबर २०२५

  • शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२५ (रात्री ११.५९ पर्यंत)

  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : ३० सप्टेंबर २०२५

  • ऑनलाईन परीक्षा दिनांक : लवकरच बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर होणार

  • प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची अंतिम तारीख : लवकरच प्रसिद्ध

  • मुलाखती व कागदपत्र पडताळणी : परीक्षेच्या निकालानंतर जाहीर


📑 अटी व पात्रता :

  • उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक. अधिवास दाखला (Domicile Certificate) अपलोड करावा लागेल.

  • अर्ज करताना शैक्षणिक पात्रता, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक. एकदा भरलेला अर्ज दुरुस्त करता येणार नाही.

  • परीक्षा शुल्क ऑनलाईन मोडद्वारे भरावे लागेल. भरलेले शुल्क न परतविण्यायोग्य (Non-Refundable) असेल.

  • शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, निवड पद्धती व इतर सविस्तर माहिती बँकेच्या www.sindhudurgdcc.com या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.


📢 उमेदवारांसाठी सूचना :

भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी बँकेच्या संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास आयबीपीएसच्या CGRS पोर्टलवर (https://cgrs.ibps.in/) तक्रार किंवा विचारणा करता येईल.


👉 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, दिलेल्या कालावधीत ऑनलाईन अर्ज करून आपली नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search