Konkan Railway Updates: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आज नव्याने डिझाईन केलेले KR MIRROR मोबाईल अॅप्लिकेशन सादर केले. हे अॅप्लिकेशन प्रवाशांना आधुनिक, सुलभ आणि समावेशक डिजिटल अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
हे अॅप्लिकेशन केवळ माहिती देणारे साधन न राहता आता एक संपूर्ण प्रवास साथीदार ठरत आहे. दृष्टी, हालचाल किंवा संज्ञानात्मक अडचणी असलेल्या प्रवाशांनाही सहज वापरता येईल, याची काळजी घेण्यात आली आहे. बहुभाषिक पर्याय, मोठ्या अक्षरे, तसेच डार्क/लाईट मोडसारख्या सुविधा यात उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या सुविधा:
-
गाडीचे प्रत्यक्ष धावते स्थिती व वेळापत्रक
-
स्थानकांवरील व गाड्यांवरील सेवा, केटरिंग माहिती
-
महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधा व सुरक्षा हेल्पलाईन्स
-
पर्यटन व चित्रपट स्थळांची माहिती, छायाचित्रे
-
हेल्पडेस्क व तक्रार नोंदविण्याचे पर्याय
-
कोकण रेल्वेचा इतिहास, कामगिरी व घोषणा
-
आपत्कालीन माहिती व सुरक्षा सुविधा
प्रवासी लाभ:
या अॅप्लिकेशन द्वारे प्रवाशांना जलद माहिती, सुरक्षा जागरूकता, पर्यटन नियोजन, स्थानिक भाषांतील माहिती तसेच थेट KRCL शी संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे.
हे अॅप्लिकेशन आता Google Play Store वर डाउनलोडसाठी उपलब्ध असून, खालील लिंकवर जाऊन ते डाउनलोड करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.konkanrailway.krclapp