Konkan Railway: वास्को-द-गामा : प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर – वास्को-द-गामा साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 07311/07312) आता पारंपरिक आयसीएफ डब्यांऐवजी आधुनिक एलएचबी डब्यांसह धावणार आहे.
ही सुविधा 22 सप्टेंबर 2025 पासून वास्को-द-गामा येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07311 साठी लागू होणार असून, मुझफ्फरपूर येथून 25 सप्टेंबर 2025 रोजी सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07312 पासून अमलात येईल.
रेल्वेच्या माहितीनुसार, या गाडीत यापुढे एक फर्स्ट एसी, दोन टू टियर एसी, तीन थ्री टियर एसी, नऊ स्लीपर, तीन जनरल, एक जनरेटर कार आणि एक एसएलआर असा एकूण 20 एलएचबी डब्यांचा समावेश असेल. पूर्वी या गाडीत 21 आयसीएफ डबे जोडले जात होते.
प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान व्हावा या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. संबंधित गाडीचे तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे www.enquiry.indianrail.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या बदलामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या सेवांचा अधिक सोयीस्कररीत्या लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.


