



Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्या दिनांक २१ ऑक्टोबर पासून कोकण रेल्वे मार्गावर बिगर पावसाळी वेळापत्रक लागु होणार असून रेल्वे गाड्या जलद धावण्यास सुरुवात होणार आहे.
पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येवून सर्वच गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो. कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेवून हा निर्णय कोकण रेल्वे प्रशासना कडून घेण्यात येत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यात हा वेग कमी करण्यात आला होता.
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – कोकण मार्गावरील प्रवास गतीमान होणार आहे.
दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते, परंतु यंदा पूर्व पावसाळी कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे १५ दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपविण्यात आले आहे.
त्यामुळे आता प्रवाशांना मुंबई – कोकण मार्गावर जलद प्रवास करता येणार आहे. गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी NTES या रेल्वेच्या अधिकृत अॅप वर आपण प्रवास करणार असलेल्या गाडीचे वेळापत्रक आणि सद्यस्थिती तपासावे.