सिंधुदुर्ग : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (अंबिया बहार, सन २०२४-२५) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा नुकसानभरपाईचे वितरण सुरू झाले आहे. या अंतर्गत आतापर्यंत २४,९१८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल ६९.४८ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये देखील नुकसानभरपाईची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यातील गरीब व कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा लाभ दिवाळीपूर्वी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत.
Facebook Comments Box