मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुका २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाने आपली कंबर कसली असून, प्रचारासाठी ४० ‘स्टार प्रचारक’ नेत्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी जाहीर करण्यात आली असून, यात दिग्गज नेत्यांपासून ते युवा चेहऱ्यांपर्यंत सर्वांना स्थान देण्यात आले आहे.
प्रचाराची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर
या यादीत पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांच्यासोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ हे देखील प्रचाराचे मुख्य आकर्षण असतील.
शिवसेनेने या यादीत अनुभव आणि तरुण रक्त यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
यादीतील प्रमुख नावे:
शिवसेनेने या यादीत अनुभव आणि तरुण रक्त यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत:
कॅबिनेट मंत्री: गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दीपक केसरकर.
खासदार: डॉ. श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, मिलिंद देवरा, आणि नरेश म्हस्के.
महिला नेतृत्व: डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि शयना एन.सी.
इतर महत्त्वाचे चेहरे: संजय निरुपम, नीलेश राणे आणि प्रसिद्ध अभिनेते व माजी खासदार गोविंदा आहुजा.
शिवसेना स्टार प्रचारक संपूर्ण यादी (२०२५-२६)
१. मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री)
२. श्री. रामदास कदम (नेते)
३. श्री. गजानन कीर्तीकर (नेते)
४. श्री. आनंदराव अडसूळ (नेते)
५. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते)
६. श्री. प्रतापराव जाधव (केंद्रीय मंत्री)
७. डॉ. नीलमताई गोऱ्हे (नेत्या)
८. सौ. मिनाताई कांबळी (नेत्या)
९. श्री. गुलाबराव पाटील (नेते व मंत्री)
१०. श्री. दादाजी भुसे (उपनेते व मंत्री)
११. श्री. उदय सामंत (उपनेते व मंत्री)
१२. श्री. शंभूराज देसाई (उपनेते व मंत्री)
१३. श्री. संजय राठोड (मंत्री)
१४. श्री. संजय शिरसाट (प्रवक्ते व मंत्री)
१५. श्री. भरतशेट गोगावले (उपनेते व मंत्री)
१६. श्री. प्रकाश आबिटकर (मंत्री)
१७. श्री. प्रताप सरनाईक (मंत्री)
१८. श्री. आशिष जयस्वाल (राज्यमंत्री)
१९. श्री. योगेश कदम (राज्यमंत्री)
२०. श्री. दिपक केसरकर (प्रवक्ते व आमदार)
२१. श्री. श्रीरंग बारणे (उपनेते व खासदार)
२२. श्री. धैर्यशील माने (खासदार)
२३. श्री. संदीपान भुमरे (खासदार)
२४. श्री. नरेश म्हस्के (खासदार)
२५. श्री. रवींद्र वायकर (खासदार)
२६. श्री. मिलिंद देवरा (खासदार)
२७. डॉ. दीपक सावंत (उपनेते व माजी मंत्री)
२८. श्री. शहाजी बापू पाटील (उपनेते व माजी आमदार)
२९. श्री. राहुल शेवाळे (उपनेते व माजी खासदार)
३०. डॉ. मनिषा कायंदे (सचिव व आमदार)
३१. श्री. निलेश राणे (आमदार)
३२. श्री. संजय निरुपम (प्रवक्ते)
३३. श्री. राजू वाघमारे (प्रवक्ते)
३४. डॉ. ज्योती वाघमारे (प्रवक्ते)
३५. श्री. पूर्वेश सरनाईक (युवासेना कार्याध्यक्ष)
३६. श्री. राहुल लोंढे (युवसेना सचिव)
३७. श्री. अक्षयमहाराज भोसले (शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना)
३८. श्री. समिर काझी (कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग)
३९. श्रीमती शयना एन.सी. (राष्ट्रीय प्रवक्त्या)
४०. श्री. गोविंदा आहुजा (माजी खासदार)



