मुंबई: कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता, तिरुनेलवेली – दादर – तिरुनेलवेली साप्ताहिक एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डबा (कोच) कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
या निर्णयामुळे या गाडीची एकूण क्षमता आता १५ कोचवरून वाढून १६ एलएचबी (LHB) कोच इतकी झाली आहे. नव्या बदलांनुसार गाडीमध्ये आता ‘३ टायर एसी’ (3 Tier AC) चा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे.
सुधारित कोच रचना खालीलप्रमाणे असेल:
२ टायर एसी: ०१ कोच
३ टायर एसी: ०२ कोच (आधी १ होता)
३ टायर इकॉनॉमी: ०१ कोच
स्लीपर क्लास: ०६ कोच
जनरल डबे: ०४ कोच
जनरेटर कार: ०१
SLR कोच: ०१
नवीन बदल कधीपासून लागू होणार?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन हा बदल खालील तारखांपासून अंमलात आणण्यात येणार आहे.
१. गाडी क्र. २२६२९ (तिरुनेलवेली ते दादर): २४ डिसेंबर २०२५ पासून.
२. गाडी क्र. २२६३० (दादर ते तिरुनेलवेली): २५ डिसेंबर २०२५ पासून.
दक्षिण रेल्वेच्या या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना, विशेषतः वातानुकूलित श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.


