मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथील यार्डमधील पिट लाईन क्रमांक ३ च्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी १ जानेवारी २०२६ पासून ३० दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे मध्य रेल्वेने कोकण आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या पनवेल स्थानकावर ‘शॉर्ट टर्मिनेट’ आणि तेथूनच ‘शॉर्ट ओरिजिनेट’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बदलाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
पनवेल स्थानकावर समाप्त होणाऱ्या गाड्या (Short Termination):
१. गाडी क्रमांक १६३४६ (तिरुवनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस):
३१ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत सुटणारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी पनवेल स्थानकावर प्रवासाचा शेवट करेल. पनवेल ते एलटीटी दरम्यान ही गाडी रद्द राहील.
२. गाडी क्रमांक १२६२० (मंगळुरू सेंट्रल – एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस):
३१ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या दरम्यान सुटणारी ही गाडीचा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त होईल. पनवेल ते एलटीटी दरम्यानचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
पनवेल स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या (Short Origination):
१. गाडी क्रमांक १६३४५ (एलटीटी – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस):
२ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या काळात ही गाडी एलटीटी ऐवजी पनवेल स्थानकावरून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. एलटीटी ते पनवेल दरम्यानची सेवा रद्द राहील.
२. गाडी क्रमांक १२६१९ (एलटीटी – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस):
१ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही गाडी एलटीटी ऐवजी पनवेल स्थानकावरून सुटेल. एलटीटी ते पनवेल दरम्यानची सेवा रद्द असेल.
प्रवाशांना विनंती: प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या तांत्रिक कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.


