मुंबई: मध्य रेल्वे (CR) ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि दादर येथून धावणाऱ्या 10 लांब पल्ल्याच्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. या निर्णयामुळे पीक अवर्समध्ये स्थानिक गाड्यांसाठी अधिक मार्गिका उपलब्ध होतील आणि विलंबात घट होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
यातील ज्या गाड्या एलटीटी टर्मिनस येथे स्थलांतरित करण्यात येणार्या चार गाड्यांची नावे हाती आली असून ती खालील प्रमाणे आहेत.
एलटीटी टर्मिनस येथे स्थलांतरित करण्यात गाड्यांची नावे खालीलप्रमाणे
- 22629 दादर – तिरुनेलवेली एक्सप्रेस (कोकण रेल्वे मार्गे)
- 16331 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –तिरुवनंतपुरम (टीव्हीसी) एक्सप्रेस
- 16351 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल एक्सप्रेस
- 16339 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल एक्सप्रेस
या बदलामुळे सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या गर्दीच्या वेळेत सुमारे 40 ते 50 हजार अतिरिक्त प्रवाशांना स्थानिक सेवांचा लाभ मिळू शकतो. सध्या CSMT आणि दादर येथे उशिरा येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे स्थानिक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते, त्यामुळे दररोज अनेक लोकल गाड्या विलंबाने धावतात.
CR च्या योजनेनुसार काही लांब पल्ल्याच्या गाड्या CSMT आणि दादरऐवजी LTT किंवा पनवेल येथे सुरू–समाप्त केल्या जातील. यामुळे CSMT–कसारा/कर्जत मार्गावर सुमारे 15 अतिरिक्त उपनगरीय लोकल सेवा चालवणे शक्य होईल. तसेच काही गाड्यांचे वेळापत्रक 10 मिनिटांपर्यंत बदलण्याचाही विचार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बदल केवळ टर्मिनस बदलण्यापुरता मर्यादित नसून, काही गाड्यांचे डबे वाढवून प्रवासी क्षमता वाढवण्याचाही प्रस्ताव आहे.
मात्र, प्रवासी संघटनांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. LTT किंवा पनवेल येथे टर्मिनस बदलल्यास लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अतिरिक्त अंतर व वाहतुकीचा त्रास सहन करावा लागू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.


