मुंबई: महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत अखेर आज जाहीर झाली आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. या आरक्षणामुळे अनेक शहरांतील राजकीय समीकरणे बदलणार असून, दिग्गजांच्या नजरा आता आपल्या प्रभागातील गणितांकडे लागल्या आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांसाठी ही सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि खुला प्रवर्ग (Open) अशा विविध प्रवर्गांसाठी पदे आरक्षित करण्यात आली आहेत.
प्रमुख शहरांतील आरक्षणाची स्थिती
१. महिलांसाठी आरक्षित महापालिका (खुला प्रवर्ग):
राज्यातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी मुंबई महानगरपालिका यंदा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. यासोबतच खालील शहरांतही महिला महापौर विराजमान होतील:
मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड, धुळे, मालेगाव आणि मीरा-भाईंदर.
२. अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST):
कल्याण-डोंबिवली: अनुसूचित जमाती (ST) – सर्वसाधारण.
ठाणे: अनुसूचित जाती (SC) – सर्वसाधारण.
जालना आणि लातूर: अनुसूचित जाती (SC) – महिला.
३. इतर मागास प्रवर्ग (OBC):
पनवेल, उल्हासनगर, कोल्हापूर, इचलकरंजी: ओबीसी – सर्वसाधारण.
अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव: ओबीसी – महिला.
राजकीय हालचालींना वेग
आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे, तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत महिला आरक्षण आल्यामुळे राजकीय पक्षांना आता महिला उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे.
पुढील काही दिवसांत या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला वेग येईल, हे निश्चित.
महानगरपालिका नुसार आरक्षण यादी
महापालिका आरक्षणाचा प्रवर्ग
- मुंबई सर्वसाधारण (महिला)
- पुणे सर्वसाधारण (महिला)
- नागपूर सर्वसाधारण (महिला)
- पिंपरी चिंचवड सर्वसाधारण (महिला / पुरुष)
- ठाणे अनुसूचित जाती (महिला / पुरुष)
- नाशिक सर्वसाधारण (महिला)
- कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती (महिला / पुरुष)
- छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
- वसई विरार सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
- सोलापूर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
- नवी मुंबई सर्वसाधारण (महिला)
- मिरा भाईंदर सर्वसाधारण (महिला)
- अमरावती सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
- पनवेल ओबीसी- (महिला / पुरुष)
- भिवंडी- निजामपूर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
- नांदेड- वाघाळा सर्वसाधारण (महिला)
- अकोला ओबीसी (महिला)
- मालेगाव सर्वसाधारण (महिला)
- कोल्हापूर ओबीसी- (महिला / पुरुष)
- सांगली- मिरज- कुपवाड सर्वसाधारण खुला
- जळगाव ओबीसी (महिला)
- धुळे सर्वसाधारण (महिला)
- उल्हासनगर ओबीसी- (महिला / पुरुष)
- लातूर अनुसूचित जाती (महिला)
- अहिल्यानगर ओबीसी (महिला)
- चंद्रपूर ओबीसी (महिला)
- परभणी सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
- इचलकरंजी ओबीसी (महिला / पुरुष)
- जालना अनुसूचित जाती (एससी महिला)


