मुंबई: प्रजासत्ताक दिनी सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
या गाड्यांचे आरक्षण २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.
१. मुंबई – नागपूर – मुंबई विशेष (०२ सेवा)
नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे.
गाडी क्र. ०२१३९ विशेष: शनिवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी CSMT येथून मध्यरात्री ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
गाडी क्र. ०२१४० विशेष: शनिवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी नागपूर येथून रात्री २०.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १३.३० वाजता CSMT मुंबईला पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा:
दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
गाडीची रचना (LHB कोचेस):
१ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, ६ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ९ शयनयान (Sleeper), ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ जनरेटर/गार्ड व्हॅन.
२. मुंबई – मडगाव – मुंबई विशेष (०२ सेवा)
कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही विशेष गाडी उपयुक्त ठरेल.
गाडी क्र. ०११२९ विशेष: रविवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून पहाटे ०१.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.०० वाजता मडगावला पोहोचेल.
गाडी क्र. ०११३० विशेष: रविवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी मडगाव येथून दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजता LTT ला पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा:
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
गाडीची रचना (ICF कोचेस):
१ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, ३ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ८ शयनयान (Sleeper), ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण आणि तिकीट विक्री
गाडी क्रमांक ०२१३९, ०२१४० आणि ०११२९ चे आरक्षण २३ जानेवारी २०२६ पासून सर्व संगणकीकृत केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) उपलब्ध होईल.
अनरक्षित डब्यांसाठी प्रवासी UTS मोबाइल ॲप किंवा तिकीट खिडकीवरून सामान्य दरात तिकीट घेऊ शकतील.


