कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून आता या महामार्गाची नवी अलाइनमेंट पुढे आली आहे. राज्य शासनाने या बदलाला मंजुरी दिल्यानंतर महामार्गाची दिशा काही प्रमाणात बदलणार आहे.
नवीन अलाइनमेंटमुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांना वगळून या भागातील वेगळ्या मार्गाने महामार्ग नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नव्या मार्गानुसार अनेक तालुक्यांतील गावांमधून हा महामार्ग जाणार आहे.
नव्या अलाईन्मेंटनुसार संभाव्य गावे:
नव्या प्रस्तावाप्रमाणे सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील तालुक्यांमधील गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे:
पलूस तालुका: देवराष्ट्रे, कुंभारगाव, कुंडल, घोगाव, मसुचीवाडी, जुने खेड, बोरगाव.
वाळवा तालुका: वाळवा, उरण, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरळप, ऐतवडे खुर्द.
हातकणंगले व पन्हाळा तालुका: पारगाव, बहिरेवाडी, जाखले, गिरोली, पोहाळे तर्फ आळते, कुशिरे, मनपाडले.
करवीर तालुका: केली, केळें, वरणगे, पाडळी बु., शिदेवाडी, खुपीरे, वाकरे, कुडित्रे, बहिरेेश्वर, बीड, गणेशवाडी, शिरोली दु., सडोली दु., भाटणवाडी, हसूर.
राधानगरी तालुका: राशिवडे बु., कोदवडे, वाघवाडे, मोहाडे, माजगाव, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, सरवडे.
कागल व भुदरगड तालुका: उंदरवाडी (कागल), खापरेवाडी, टिकेवाडी, नाधवडे, पाचवडे, बसरेवाडी, मिणचे खु., लोटेवाडी, कोळवण, पालेवाडी, भाटिवडे, हेदवडे, देवकेवाडी, शेणगाव, कराडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुले, मेघोली, अरळगुंडी.
आजरा तालुका: कोरीवडे, हरपवडे, पेरनोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मासोळी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी.
चंदगड तालुका:गवसे, भुजवडे, कुर्णी, म्हाळुंगे, बिझूर, भोगोली, कानूर बु., पिलानी, जांबरे आणि इसापूर.
दोडामार्ग तालुका:कुंभवडे, भेकुर्ली, कोळझर आणि झोळंबे.
सावंतवाडी तालुका: पडवे माजगाव, पडवे, देगाव आणि बांदा.
या बदलामुळे काही गावांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, महामार्ग प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रशासनाला मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.


