Category Archives: मुंबई

‘चाकरमानी’ निघालेत गावाला; चैन पडेना ‘राजकारण्यांना’

   Follow us on        

मुंबई दि.१५ एप्रिल :लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळी सुट्टीत आली़ असल्याने मुंबई पुण्यातील राजकारण्यांची चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी निवडणुकीच्या काळात गावी जाणार असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धास्ती  वाढली आहे.

आतापासूनच पुढे मे अखेरपर्यंत मेल-एक्स्प्रेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेच्या अतिरिक्त गाड्याही फुल्ल झाल्या आहेत.

मुंबईत दिनांक 20 मे रोजी मतदान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापुर तसेच वसई विरार येथे मोठया प्रमाणात कोकणातील चाकरमानी वास्तव्यास आहे. कोकणातील आंबे फणस चाखण्यासाठी तसेच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा लोकसभा निवडणुक असल्याने चाकरमानी गावी जाणार नाहीत आणि येथेच राहून आपले कर्तव्य पार पाडणार असे वाटत होते. रेल्वे, एसटी खाजगी वाहनांच्या आरक्षणाची स्थिती पाहता यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उन्हाळी सुट्टीत गावीच जाणार असल्याचे दिसत आहे.  20 मेपर्यंत तरी चाकरमानी परततील की नाही या या विचाराने राजकारण्यांना चैन पडेनाशी झाली आहे.

कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचा प्रवाशाचा ओघ पाहता १,२०० रुपयाच्या तिकीटदरात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या महिनाभराच्या काळात किमान ५ लाखांहून अधिक चाकरमानी गावाकडे जाणार असल्याचा अंदाज वाहतूक एजन्सीकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ४० आणि ४५ टक्क्यांवर अडकलेली लोकसभा मतदानाची टक्केवारी यंदाही तशीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

मुंबई गोवा वंदेभारत एक्सप्रेसची तिकिटे मिळता मिळेनात; डबे वाढविण्याची मागणी

   Follow us on        

मुंबई दि. २९:कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यात आलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.

मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा सध्या चालविण्यात येणारा रेक आठ डब्यांचा आहे. देशात सुरु करण्यात आलेल्या यशस्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तिची गणना केली जात आहे. ही गाडी सातत्याने सुमारे ९५% क्षमतेने Occupancy धावत आहे. या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीच या गाडीला असलेली लोकप्रियता दाखवून देत आहे. तथापि, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रवासांचा हिरमोड होत आहे.

या मार्गावरील प्रवासाची उच्च मागणी लक्षात घेता, या समस्येवर त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला विनंती करू इच्छितो की, मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची 16 डब्यांची रेक तैनात करून डब्यांची क्षमता वाढविण्याचा विचार करावा.

अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवल्याने सध्याची सीटची कमतरता तर दूर होईलच पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रस्तावाचा अनुकूलपणे विचार करा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला केली आहे.

APMC Market | होळीच्या दिवशी हापूसची मोठी आवक; सध्याच्या दर काय?

नवी मुंबई:रविवारी होळीच्या दिवशी कोकणातून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कोकणातून ३०६८१ पेट्या व इतर राज्यातून ६०५७ अशा एकूण ३६ हजार ७३८ पेट्या आंब्याची आवक झाली आहे. होळी व धूलिवंदनला सर्व बाजारपेठा बंद असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केट रविवारी होळीच्या दिवशी सुरू ठेवले होते. दिवसभरात ३६ हजार पेट्या आंब्याची आवक झाली.

सलग दोन दिवस मार्केट बंद राहिल्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने रविवारी व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी दिली हाेती.

हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने त्याच्या दरात पण घसरण होताना दिसत आहे. होलसेल मार्केट मध्ये हापूस ३०० ते ८०० रुपये डझन तर किरकोळ मार्केट मध्ये ६०० ते १५०० रुपये डझन दराने विकला जात आहे.

Mumbai Local | स्थानकांच्या नामांतरास मुंबईकरांचा विरोध.

मुंबई, दि. १६ फेब्रु. :मुंबईतील आठ रेल्वे स्थानकाची जुनी ब्रिटिशकालीन नावे बदलून अस्सल मराठी नावे देण्याचा प्रस्ताव नुकताच मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व जनतेकडून होत असले तरी यातील दोन स्थानकाच्या नावाबद्दल मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यातील पहिले स्थानक आहे ते किंग्ज सर्कल. या स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असे नामकरण होणार आहे. मात्र मराठी एकीकरण कृती समितीने याला विरोध दर्शविला आहे. तीर्थंकर पार्श्वनाथ हे अनेकांना माहिती नाहीत त्यामुळे या नावाला विरोध आहे.तीर्थंकर पार्श्वनाथ हे मराठी नाव नसल्याने या नावावर या समितीने आक्षेप घेतला आहे.

मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ असे होणार आहे. या नावाला विरोध नाही पण या नावात ‘मुंबई’ हा शब्द कायम ठेवावा अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी केली आहे यासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही म्हणाले आहेत.

 

Video | सावधान! पनवेल स्थानकावर घडू शकते परळ सारखी दुर्घटना

पनवेल : पनवेल स्थानक गर्दीचे स्थानक बनले आहे. या रेल्वेस्थानकात कधीही दुर्घटना घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे वास्तव सध्या पनवेलच्या रेल्वे स्थानकामधील आहे. प्रवाशांना दररोज जिवमुठीत घेऊन या पादचारी पुलावरुन जावे लागते. गावी जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांसाठी आणि लोकलसाठी येथे वापरात असलेल्या पादचारी पुलांचे योग्य नियोजन केलेले नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगरा चेंगरी होण्याचा धोका आहे.
पनवेल रेल्वेस्थानक हे जंक्शन होत आहे. दररोज या स्थानकातून सूमारे सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. यातील पन्नास हजार प्रवासी नवीन पनवेल परिसरातून मुंबई, ठाणे व इतर उपनगरीय रेल्वे गाड्या पकडण्यासाठी या पादचारी पुलाचा वापर करतात. नवीन पनवेल व रेल्वेस्थानक जोडण्यासाठी सध्या हाच एक पुल प्रवाशांसाठी शिल्लक आहे. सध्या स्थानकात विस्तारीकरणाचे काम सूरु आहे. प्रवाशांना दररोज जिवमुठीत घेऊन या पादचारी पुलावरुन जावे लागते. एक्सप्रेसमधून उतरणा-या प्रवाशांना गर्दीतून पाठीवरील बोजा घेऊन मार्ग काढावा लागतो. या गर्दीचा भयानक अनुभव सध्या पनवेलचे रेल्वे प्रवासी घेत आहेत. पादचारी पुलावरील ही गर्दी टाळण्यासाठी हताश झालेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडून बेकायदा व जिवघेणा प्रवास करत आहेत.
अशा वेळी दुर्घटना होण्याची शक्यता 
पनवेल स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांसाठी सध्या ३ प्लॅटफॉर्म आहेत. कोणत्याही गाडीसाठी निश्चित असा प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. कित्येक प्रवासी बाहेरच्या प्लॅटफॉर्मवर किंवा पादचारी पुलावर गाडी येण्याची वाट पाहत असतात. अशा वेळी अचानक गाडीची घोषणा झाल्यावर चेंगरा चेंगरी होऊन दुर्घटना  घडण्याची मोठी शक्यता आहे.

 

BEST च्या धर्तीवर कल्याण- भिवंडी-उल्हासनगर-बदलापूर साठी संयुक्त परिवहन सेवा

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगाव -बदलापूर नगर परिषद यांची संयुक्त परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला.
संयुक्त परिवहन सेवेद्वारे मुंबई महानगर परिसरासाठी रेल्वे व्यतिरिक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्राच्या नजिक असलेली भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगांव बदलापूर नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रांत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांमार्फत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
या संयुक्त परिवहन सेवेकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहाड येथे संयुक्त परिवहन उपक्रमाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी परिवहन भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्युत बस प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणावर शासनाचा भर आहे. या परिवहन सेवेत नव्या विद्युत बसगाडयांचा समावेश करण्यात येणार असल्याने शहरामधील हवा प्रदूषणाची पातळी नियंत्रित करणे किंवा कमी करणे शक्य होईल.

Mumbai Local | रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून अस्सल मराठी नावे दिसणार

मुंबई: मुंबईतील ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंबधी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

कोणत्या स्टेशनची नावे बदलणार?
करीरोडचं नाव – लालबाग
सॅण्सरोडचं – डोंगरी,
मरीनलाईन्सचं – मुंबादेवी
डॉकयार्डचं – माझगाव स्टेशन
चर्नीरोडचं नाव – गिरगाव,
कॉर्टन ग्रीन – काळाचौकी आणि
किंग्ज सर्कलचं – तिर्थकर पार्श्वनाथ

अशी नावे करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. ही नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे असेही शेवाळे यांनी यावेळी नमूद केलं. तर मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ हे ठेवण्यात यावं असा प्रस्ताव देखील केंद्राला देण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितलं.

ही नावं लवकरात लवकर बदलण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत. तसेच ज्या ज्या मागण्या आल्या आहेत त्यानुसार त्या नावांमध्ये बदल करण्यात येईल असेही शेवाळे यांनी यावेळी सांगितले.

 

APMC Market | सिंधुदुर्ग-रत्नागिरीतून दररोज हापूसच्या १४ हजार पेट्यांची आवक; दर काय आहे?

नवी मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ात दिवसा उन्हाचा ताप जाणवत आहे. त्यामुळे आंबा काढणीयोग्य झालेला आहे. दोन्ही जिल्ह्यांतून दिवसाला १४ हजार पेट्या वाशी बाजार समितीमध्ये पाठविल्या जात आहेत. आवक स्थिर असल्यामुळे पेटीचे दर २ हजारांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहेत.
पहिल्या पंधरवड्यात पेट्यांची संख्या कमी होती; मात्र त्यानंतर त्यात वाढ होऊ लागली. मार्चच्या सुरवातीला उन्हाचा कडाका जाणवू लागल्यानंतर फळे तयार होण्याचा वेगही वाढला.
पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्चअखेरपर्यंत राहील, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात काही दिवस पेट्यांची संख्या कमी राहील. पुन्हा काही दिवस आंबा मिळेल, पण ते प्रमाणही तुलनेत कमी राहील. गेल्या काही दिवसांत पुन्हा झाडांना मोहोर येऊ लागला आहे. त्यामधून प्रत्यक्ष उत्पादन मे महिन्याच्या अखेरीस मिळेल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.

Konkan Railway | “….तर लवकरच मुंबई ते कोकण दुसरी वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसेल .”

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या मुंबई – मडगाव एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ही एक्सपेस अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. दुसऱ्या बाजूला मडगाव ते मंगुळुरु या मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सपेस हल्लीच सुरु झाली असून कोकण रेल्वेच्या पूर्ण पट्ट्यात वंदे भारत एक्सप्रेस ची सेवा सुरु झाली आहे. मात्र दक्षिणेकडील एका खासदाराने रेल्वे मंगुळुरु ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात यावी अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास लवकरच मुंबई ते कोकण रेल्वे मार्गावर दोन एक्सप्रेस धावताना दिसतील.
दक्षिण कन्नडचे खासदार नलीन कुमार कटील यांनी ही मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून मंगुळुरु ते मुंबई हे अंतर दिवसात (१२ तासात) गाठेल अशी एक्सप्रेस मिळावी असे आमचे स्वप्न होते. आता ते स्वप्न पूर्ण करेल अशी अतिजलद गाडी वंदे भारत आता मुंबई ते मडगाव तसेच दुसरी गाडी मडगाव ते मंगळुरु या मार्गावर चालविण्यात येत आहे. मात्र मुंबई ते मंगुळुरु अशा अखंड  गाडीची सर्वात जास्त गरज आहे. अशी गाडी चालू झाल्यास दक्षिणेकडील प्रवाशांना दिवसात मुंबई गाठणे सोपे होईल असे खासदार नलीन कुमार कटील यांनी या पत्रात म्हंटले आहे.
याशिवाय त्यांनी रेल्वेस याबाबत २ पर्याय असल्याचे निदर्शनास आणूनही दिले आहे. त्यातील पहिला पर्याय म्हणजे सध्या मुंबई ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २२२२९/३० जी आठ डब्यांची चालविण्यात येत आहे ती १६ डब्यांची करून तिचा विस्तार मंगुळुरु पर्यंत करण्यात यावा. जर या गाडीचा मंगुळुरुपर्यंत विस्तार करण्यात काही अडचणी असतील दुसरा पर्याय म्हणजे सध्या मंगुळुरु ते मडगाव  दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २०६४५/४६ या गाडीचा मुंबई पर्यंत विस्तार करण्यात यावा. डब्यांची संख्या तीच ठेवून आठवड्यातून ३ दिवस ही गाडी चालविण्यात यावी असे त्यांनी या आपल्या मागणीत म्हंटले आहे.
खासदार साहेबाची ही मागणी पूर्ण झाली तर लवकरच मुंबई ते कोकण २ वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतील हे मात्र नक्की

या वीकएंडला अटल सेतूने प्रवास करण्याचा प्लॅन आखत असाल तर ही बातमी वाचाच

नवी मुंबई : रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा – शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाने अधिसूचना काढून दिली आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत.
या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून वाहतूक विभागाकडे हा मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रवेशबंदी जाहीर करणारी सूचना नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी काढली असल्याची माहिती न्हावाशेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. बी. मुजावर यांनी दिली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search