Category Archives: मुंबई

मोठी बातमी! पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक जाहीर; १ सप्टेंबरपासून अमलबजावणी

   Follow us on        

मुंबई: ​पश्चिम रेल्वेने १ सप्टेंबरपासून नवीन उपनगरीय वेळापत्रक (क्रमांक ७९) लागू केले असून, एकूण १४१४ फेऱ्यांची संख्या कायम ठेवत गाड्यांचे व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि परिणामकारक करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी बोरिवली स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेची काही निवडक चर्चगेट-विरार लोकल बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी अवघ्या ६ मिनिटांच्या फरकाने दुसरी एसी लोकल उपलब्ध केली जाईल. विशेष म्हणजे, या गाड्यांचे दहिसरमधील थांबे कायम ठेवण्यात आले असून, दहिसर हे एक महत्त्वाचे प्रवासी केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे यामुळे स्पष्ट होते.

​प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार दररोजच्या एसी लोकल फेऱ्या १४५ वरून १४७ करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये १७:२८ ची चर्चगेट-बोरीवली आणि १८:२४ ची बोरीवली-चर्चगेट लोकल आता एसी स्वरूपात धावतील. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी दादर ते डहाणू रोड अशी थेट सेवा सुरू करण्यात आली असून, ती दादरहून १७:२२ वाजता सुटून १९:३० वाजता डहाणू रोडला पोहोचेल. तसेच, सकाळी विरारवरून सुटणारी ०८:२३ ची विरार-दादर लोकल आता थेट चर्चगेटपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे सकाळी चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांसाठी भाईंदर-विरार, बोरीवली-भाईंदर आणि बोरीवली-विरार या मार्गांवर नवीन रात्रीच्या फेऱ्या जोडण्यात आल्या आहेत.

​कमी गर्दीच्या आणि विनावापर ठरणाऱ्या ६ फेऱ्या रद्द करून त्याजागी प्रवाशांच्या खऱ्या गरजेनुसार नवीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या वैज्ञानिक आणि प्रवाशाभिमुख बदलांमुळे मुंबई उपनगरीय रेल्वेचे जाळे अधिक सुव्यवस्थित होऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेळेवर होण्यास मदत होईल.

१ सप्टेंबरपासून दुधाच्या दरात ९ रुपयांची वाढ; पशुखाद्याच्या महागाईमुळे तबेला दूध महागणार

 

   Follow us on        

मुंबई: मुंबईत तबेला किंवा शेतकरी पुरवठा करणाऱ्या दुधाच्या किमतीत मोठी वाढ होणारआहे. बॉम्बे मिल्क प्रोड्यूसर्स असोसिएशनने घाऊक दर प्रति लिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन दर १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होईल आणि तो फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यंत कायम राहील.

वाढत्या पशुखाद्याच्या किमती आणि जनावरांच्या देखभालीच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. धान्य, तूर चुनी, चणा चुनी यांसारख्या खाद्यपदार्थांच्या किमतीत सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तेलबिया आणि इतर निविष्ठांच्या दरातही वाढ झाल्याने दूध उत्पादकांना सध्याच्या दरात उत्पादन सुरू ठेवणे कठीण झाले होते. या वाढीमुळे थेट शेतकऱ्यांकडून किंवा तबेलातून दूध घेणाऱ्या ग्राहकांना किरकोळ पातळीवर सुमारे ११० रुपये प्रति लिटरपर्यंत मोजावे लागू शकते. सध्याची किरकोळ किंमत सुमारे १०० रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे.

ही वाढ सणासुदीच्या काळाच्या आधीच आली असल्याने घराघरांत दुधाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितले की, अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी एकरकमी वाढ आहे. उत्पादकांना दिलासा मिळावा आणि उत्पादन खर्च भरून निघावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी गोकुळ सारख्या सहकारी संघटनेनेही काही प्रमाणात दरवाढ केली होती, पण तबेला दुधाची वाढ वेगळी आहे. ग्राहकांना चहा, मिठाई, दही, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही परिणाम जाणवू शकतो. दूध उत्पादक आणि पुरवठादार या वाढीमुळे थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे, तर मुंबईतील सामान्य ग्राहकांसाठी दैनंदिन खर्चात आणखी वाढ होणार आहे.

 

 

सुभाष चंद्रा दिवाळखोरी प्रकरणात ९९% ‘हेअरकट’? विरोधात मानवता विकास परिषद आक्रमक; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

   Follow us on        

रत्नागिरी: देशातील बँकिंग व्यवस्था, कर्जवसुलीची विश्वासार्हता आणि सामान्य ठेवीदारांच्या हितासंदर्भात एका अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्यावर मानवता विकास परिषद तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर निवेदन पाठवले आहे. सुभाष चंद्रा यांच्या वैयक्तिक इन्व्हॉल्व्हन्सी (Insolvency) प्रकरणात NCLT ने मंजूर केलेल्या अत्यंत कमी परतफेडीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत.

​काय आहे नेमके प्रकरण?

सुभाष चंद्रा यांच्या वैयक्तिक इन्व्हॉल्व्हन्सी प्रकरणातील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) मंजूर योजनेनुसार, तब्बल ₹२२,००६.५७ कोटींच्या admitted creditor claims विरुद्ध कर्जाऊ देणाऱ्या संस्थांसाठी (creditors) केवळ ₹६.२५ कोटींची परतफेड निश्चित करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे तब्बल ९९.९७% इतका प्रचंड मोठा ‘हेअरकट’ (Haircut – कर्जमाफी/तूट) झाल्याने देशभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

​या संपूर्ण प्रक्रियेत ८०.८१४% मतदान हिस्सा असलेल्या creditors ने योजनेला समर्थन दिले असले, तरी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance) यांसारख्या प्रमुख वित्तीय संस्थांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. HDFC बँकेने या निर्णयाविरुद्ध NCLAT मध्ये अपील करण्याचे संकेत दिले असून, या मोठ्या तफावतीमुळे बँकिंग क्षेत्राच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​मानवता विकास परिषदेचे प्रमुख मुद्दे व मागण्या:

​समान न्यायाचा अभाव: शेतकरी किंवा लहान व्यावसायिक काही लाखांचे कर्ज फेडू शकला नाही तर त्याच्यावर जप्तीची कठोर कारवाई होते, मग हजारो कोटींच्या प्रकरणात एवढा मोठा हेअरकट कसा काय मंजूर होतो, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

​ठेवीदारांच्या कष्टाचा पैसा: बँकांमध्ये असलेला पैसा हा केवळ बँकेचा नसून तो शेतकरी, कामगार, नोकरदार आणि सामान्य जनतेच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई व बचतीचा पैसा आहे.

​स्वतंत्र चौकशीची मागणी: ₹२२,००६ कोटी आणि ₹६.२५ कोटी यांमधील प्रचंड तफावतीची आणि सुभाष चंद्रा यांच्या वैयक्तिक मालमत्ता, हमी व करारांची स्वतंत्र फॉरेन्सिक/फायनान्शियल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

​कायदेशीर लढाईला सहकार्य: HDFC बँक आणि LIC Housing Finance सारख्या dissenting creditors (विरोध करणाऱ्या बँका) यांनी घेतलेल्या कायदेशीर भूमिकेचा निष्पक्षपणे विचार करून त्यांना योग्य ती संधी मिळावी.

​पारदर्शक राष्ट्रीय माहिती प्रणाली: ₹१०० कोटी किंवा त्यापेक्षा मोठ्या कर्जप्रकरणांसाठी बँकांना झालेली प्रत्यक्ष वसुली, हेअरकट आणि सेटलमेंटची माहिती देणारी एक पारदर्शक प्रणाली तयार करावी.

​जबाबदारी निश्चित करणे: मोठ्या प्रमाणावर कर्ज मंजूर करताना रिस्क असेसमेंट करणाऱ्या आणि कर्ज बुडीत होण्यास कारणीभूत ठरलेल्या उच्च पातळीवरील निर्णयकर्त्यांची जबाबदारी निश्चित करावी.

​जनतेच्या विश्वासाची लढाई

हे निवेदन केवळ एका व्यक्तीविरुद्धची लढाई नसून भारतीय बँकिंग व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठीची एक नैतिक व सामाजिक मोहीम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. “जनतेचा पैसा हा जनतेचा विश्वास आहे; तो वाचवणे ही केवळ आर्थिक जबाबदारी नसून राष्ट्राप्रती असलेली नैतिक जबाबदारी आहे,” अशी ठाम भूमिका श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी मांडली आहे.

​या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित सक्षम संस्थांकडून कायदेशीर चौकटीत योग्य ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी दोन दिवस धावणार ‘मोदी एक्सप्रेस’

 

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबर रोजी विशेष ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन धावणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान ्यांना गावाकडे घेऊन जाणाऱ्या या विशेष रेल्वेची यावर्षीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही गाडी ९ आणि ११ सप्टेंबर रोजी दादर येथील फलाट क्रमांक १४ वरून सकाळी १०:३० वाजता कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे.

​मुंबईहून सुटणारी ही विशेष रेल्वे गाडी रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी येथे पोहोचणार असून प्रवाशांसाठी प्रवासात खाण्यापिण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या गाडीच्या तिकीट बुकिंगसाठी २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित भाजप मंडल अध्यक्षाेशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे. यामध्ये कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील चाकरमान्यांनी भाजप मंडाध्यक्षांशी, तर रत्नागिरीतील प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

​गेल्या १४ वर्षांपासून ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांना गावात पोहोचवत असताना प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान पाहून मनापासून आनंद होतो, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यंदाही सर्व चाकरमानी नाчыत-गाजत आपल्या गावाकडे जाण्यासाठी ‘मोदी एक्सप्रेस’साठी पूर्णपणे सज्ज आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली हक्काची मोदी एक्सप्रेस पकडावी आणि बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात गावाकडे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Diva: रस्त्यावरील वाहनकोंडी टाळण्यासाठी रेल्वेच्या वक्तशीरपणाचा बळी

 

दिवा: दिवा रेल्वे स्थानकाजवळ लेव्हल क्रॉसिंग गेट वारंवार आणि विहित वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवले जात असल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय आणि लांब पल्ल्याची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे हजारो चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रलंबित समस्येवर तातडीने तोडगा काढत परिसरातील रखडलेला उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी संतप्त मागणी त्रस्त प्रवाशांकडून जोर धरत आहे.

काल दुपारच्या सत्रात दिवा येथील एलसी-२९ (LC-29) हे रेल्वे गेट रस्त्यावरील अवाजवी वाहनांच्या गर्दीमुळे दुपारी १२:११ ते १२:२१ या वेळेत तब्बल १० मिनिटे रस्ते वाहतुकीसाठी खुले ठेवण्यात आले होते. या अनियोजित प्रकारामुळे मागून येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची संपूर्ण साखळीच विस्कळीत झाली, परिणामी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.

काल केवळ दुपारच्या वेळेतच नव्हे, तर सकाळी १०:३५ आणि ११:१० च्या सुमारास देखील हेच रस्ता नाक्याचे गेट प्रत्येकी १२ मिनिटांपेक्षा अधिक काळ उघडे ठेवण्यात आले होते. सकाळच्या ऐन गर्दीच्या आणि कार्यालयीन वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, ज्या ठाणे जिल्ह्यात हा गंभीर प्रकार घडत आहे, त्याच जिल्ह्याचे नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे खासदार सुपुत्र सत्तेच्या सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. असे असतानाही, अनेक दशकांपासून रखडलेला या परिसरातील रस्ते उड्डाणपुलाचा महत्त्वाचा प्रकल्प अजूनही अपूर्ण अवस्थेत पडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

रेल्वे रूळ ओलांडताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या अनास्थेमुळे सामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रेल्वे गेटवरील ताण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने ठोस पावले उचलण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

 

मुंबईकरांचा लाखो रुपयांचा मुद्देमाल पुन्हा मुंबईकरांना सुपूर्द! मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

मुंबई: मुंबई पोलिसांच्या पूर्व परिमंडळ-२ अंतर्गत येणाऱ्या सहा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या वतीने नुकताच एक विशेष सामूहिक मालमत्ता वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध गुन्ह्यांमध्ये नागरिकांचे चोरीला गेलेले किंवा जप्त केलेले साहित्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या खऱ्या मालकांच्या हाती सुपूर्द करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

​या धडक कारवाईसाठी संबंधित पोलीस पथकांनी पारंपरिक तपास पद्धतींसोबतच आधुनिक तांत्रिक ज्ञानाची आणि गुप्त माहितीची उत्तम सांगड घातली. गुन्हेगारांचा कसून शोध घेत पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत हा गुंतागुंतीचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून देत चोरीस गेलेला ऐवज पुन्हा मिळवण्यात यश मिळवले.

​या यशस्वी मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण ४१० महागडे मोबाईल फोन, ७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५ मोटारसायकल आणि रोख रक्कम रुपये ७९ हजार ८५५ असा ऐवज जप्त केला होता. या संपूर्ण मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य तब्बल ५१ लाख ७३ हजार ३४१ रुपये इतके मोठे असल्याचे समोर आले आहे.

​या सर्व वस्तूंवर हक्क सांगणाऱ्या संबंधित मूळ तक्रारदारांची खात्री पटवून त्यांना हा सर्व मुद्देमाल अधिकृतपणे परत करण्यात आला. अचानक आपले हरवलेले किंवा चोरीला गेलेले मौल्यवान साहित्य पुन्हा मिळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला आणि त्यांनी पोलिसांच्या या तत्पर कारभाराचे मनापासून आभार मानले.

​या प्रकारच्या उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होते. तसेच पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबतचा आत्मविश्वास अधिक बळावला असून, या कार्यक्षम कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचा भुलेश्वरचा राजा मंडळाला मदतीचा हात

 

मुंबई: मुंबईतील मानाचा आणि अत्यंत प्रसिद्ध गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळातर्फे’ संकटसमयी समाजसेवेचा एक आदर्श पायंडा पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची’ गणेशमूर्ती एका दुर्दैवी दुर्घटनेत क्षतिग्रस्त झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली. या दुर्घटनेमध्ये दोन निष्पाप गणेशभक्तांचा दुर्दैवी अंत झाल्याने या संपूर्ण प्रकरणाने हळहळ व्यक्त केली जात असून, या कठीण प्रसंगात भुलेश्वरच्या राजा गणेशोत्सव मंडळावर जणू वडिलधाऱ्यांचे छत्र हरवल्याची भावना निर्माण झाली होती.

​अशा या अत्यंत दुर्दैवी आणि बिकट परिस्थितीत भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला खंबीरपणे सावरण्यासाठी लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचे संचालक आणि पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. लालबागच्या राजा मंडळाने या संकटग्रस्त मंडळाला मोठा दिलासा देत थेट ११ लाख रुपयांचा भरीव मदत निधी जाहीर केला आहे. या आर्थिक मदतीमुळे भुलेश्वरचा राजा मंडळाला या मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि आगामी धार्मिक व सामाजिक कार्य पूर्ववत मार्गी लावण्यासाठी मोठा हातभार लागणार असून, यामुळे गणेशोत्सव मंडळामधील परस्पर बंधुभाव आणि आपुलकीचे दर्शन घडले आहे.

​या भीषण दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावलेले भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे दिवंगत सचिव संकेत नेवशे आणि दिवंगत ब्रिजेश जोशी यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोन्ही कर्तव्यदक्ष आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या या अपार नुकसानाची आणि कुटुंबाची होणारी हेळसांड लक्षात घेऊन, लालबागच्या राजा मंडळाने अत्यंत संवेदनशील निर्णय घेत या दोन्ही दिवंगत कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची स्वतंत्र आर्थिक मदत जाहीर केली आहे.

​लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे संपूर्ण मुंबईत आणि गणेशभक्तांमध्ये जोरदार कौतुक होत आहे. आपत्तीच्या काळात केवळ स्वतःच्या उत्सवापुरता मर्यादित न राहता इतर मंडळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि सामाजिक दायित्व जोपासणे, ही लालबागच्या राजाची परंपरा राहिली आहे. भुलेश्वरचा राजा मंडळाच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहून मंडळाने एकोपा आणि समाजोपयोगी संस्कृतीचे उत्तम उदाहरण सादर केले आहे, ज्यामुळे या कठीण प्रसंगात पीडित कुटुंबांना आणि मंडळाला मोठा मानसिक व आर्थिक आधार मिळाला आहे.

मुंबईत भीषण दुर्घटना: ‘भुलेश्वरचा राजा’ आगमन मिरवणुकीत मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, दोन चिमुकल्यांसह सात जखमी

 

मुंबई: दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या आगमन मिरवणुकीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बलराम मर्चंट रोडवर ही घटना घडली असून, उत्सवाचा आनंद क्षणात शोकसागरात बुडाला.

​या हृदयद्रावक दुर्घटनेत तब्बल 22 फूट उंच असलेली ‘भुलेश्वरचा राजा’ या गणपतीची भव्य मूर्ती अचानक तेथे उपस्थित नागरिकांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन लहान मुलांसह इतर पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

​प्राथमिक तपासानुसार, ज्या मजबूत लोखंडी फ्रेम किंवा संरचनेवर ही अवाढव्य मूर्ती उभी करण्यात आली होती, त्या चौकटीचे नट आणि बोल्ट अचानक सैल झाले होते. यामुळे संपूर्ण मूर्तीचा तोल पूर्णपणे ढासळला आणि ती एका बाजूला झुकून थेट रस्त्यावरील भाविकांच्या अंगावर जाऊन आदळली.

​या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, स्थानिक पोलीस आणि पालिकेच्या आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढून तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​या अपघातात संकेत नेवशे (वय 33) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय 30) यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, जखमींवर जीटी आणि जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. उत्सवाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा: एसटीची ‘ग्रुप बुकिंग’ स्वस्त होणार

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सूचनेनंतर, एसटीने गणेशोत्सवासाठी केल्या जाणाऱ्या बसच्या ग्रुप बुकिंगवर आकारण्यात येणारे ३० टक्के जादा शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे. शुक्रवारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली, ज्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​साधारणपणे गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी कोकणात जाण्यासाठी सुमारे ५ हजार एसटी बसेस आरक्षित केल्या जातात. प्रवाशांना त्यांच्या गावी सोडल्यानंतर, या बसेस बहुधा रिकाम्या परत आणाव्या लागतात. रिकाम्या बसेस परत आणताना एसटी महामंडळाला इंधनाचा मोठा खर्च तसेच चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा भार सोसावा लागतो. या परिस्थितीचा विचार करता, एसटीचा खर्च वाढल्यामुळेच पूर्वी ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे स्पष्टीकरण सरनाईक यांनी दिले.

​या वाढीव शुल्कामुळे प्रवाशांवर आर्थिक बोजा पडत होता. डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त कामाच्या भत्त्यांमुळे एसटीच्या खर्चात झालेली वाढ ही या शुल्कामागील प्रमुख कारणे होती. या पार्श्वभूमीवर, अनेक कोकणवासीय आणि विविध गणेशोत्सव मंडळांनी एसटी महामंडळाकडे हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची आग्रही मागणी केली होती.

​जनतेच्या आणि गणेशोत्सव मंडळांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला हे जादा शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करत एसटी प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे आता कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास अधिक सुलभ आणि खिशाला परवडणारा होणार आहे.

​परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, यापुढे यंदाच्या गणेशोत्सवासाठी करण्यात येणाऱ्या एकेरी गट आरक्षणावर (ग्रुप बुकिंगवर) कोणतेही ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. सरकार आणि एसटी महामंडळाच्या या निर्णयाचे कोकणवासीयांकडून स्वागत होत असून, यामुळे गणेश भक्तांचा कोकण प्रवासाचा खर्च कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

राज्याच्या खोल समुद्रात आता होणार ‘मसल फार्मिंग’ आणि कोबिया माशांचे संवर्धन

   Follow us on        

मुंबई: राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याचा विस्तार करण्यासाठी आता राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत, राज्याच्या खोल समुद्रात ‘मसल फार्मिंग’ (कालवे पालन) करण्यासोबतच, ‘केजिंग’ म्हणजेच जाळ्यांच्या सहाय्याने कोबिया या माशांच्या प्रजातीचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​या संदर्भात मंत्रालय येथे ‘मदर ओसियन’ या कंपनीतर्फे एका विशेष प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कंपनीचे संचालक मितेश शहा यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, तसेच कंपनीचे इतर संचालक मितेश शहा, बियॉन्ड एस्पॉय, प्रेमदीप व्होरा आणि तपन सामंत आदी वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

​मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना स्पष्ट केले की, खोल समुद्रातील या मत्स्यसंवर्धनामुळे राज्याच्या मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होईल. तसेच, या उपक्रमामुळे आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाला चालना मिळणार असून, मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगार निर्मितीसोबतच गुंतवणुकीच्या नवीन संधी देखील उपलब्ध होणार आहेत.

​या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिक मच्छिमारांच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले आहेत. स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेला जावा, जेणेकरून त्यांचा विरोध टाळून सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या राबवता येईल, यावर त्यांनी भर दिला.

​प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकताना असे स्पष्ट करण्यात आले की, या उपक्रमांतर्गत खोल समुद्रात सुमारे ६० मीटर आकाराचे जाळे उभारले जाणार आहे. त्या जाळ्यामध्ये कोबिया या माशांच्या जातीचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन आणि संवर्धन केले जाईल. यासोबतच, खोल समुद्रात ‘मसल’ म्हणजेच कालवे पालन करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा देखील यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search