एलटीटी स्थानकावर ५६ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक; एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे विविध पायाभूत सुविधांच्या विस्तार आणि कामांसाठी ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा ब्लॉक बुधवार, दिनांक २४.०६.२०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजल्यापासून सुरू होणार असून शुक्रवार, दिनांक २६.०६.२०२६ रोजी दुपारी १६:०० वाजेपर्यंत सुरू राहील. या ५६ तासांच्या कालावधीत शंटिंग नेकचे बांधकाम, ‘सिक सायडिंग’ आणि देखभाल सायडिंग यार्डमधील बदल, तसेच पिट लाइन्सचा विस्तार आणि पाणीपुरवठा, ड्रेनेज व पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीचे वळण बदलणे अशी महत्त्वपूर्ण कामे केली जाणार आहेत. या ब्लॉकमुळे पहिल्या ८ तासांसाठी ‘सिक कलेक्शन लाइन’ व वॉशिंग पिट लाइन क्र. ६, ७ व ८ आणि पुढील ४८ तासांसाठी वॉशिंग पिट लाइन क्र. ७ व ८ प्रभावित राहतील.

​या विशेष ब्लॉकमुळे निवडक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवांवर मोठा परिणाम होणार असून काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत, तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, २३ जून २०२६ रोजी प्रवास सुरू करणाऱ्या चार प्रमुख गाड्या ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट (प्रवास आधीच समाप्त) केल्या जातील. यामध्ये गाडी क्र. १२६२० मंगळुरू सेंट्रल – LTT मत्स्यगंधा एक्स्प्रेस, गाडी क्र. २२१८० चेन्नई – LTT एक्स्प्रेस, गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम – LTT नेत्रावती एक्स्प्रेस आणि गाडी क्र. १५०१८ गोरखपूर – LTT एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

​याशिवाय, २४ जून २०२६ रोजीच्या रेल्वे वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २४.०६.२०२६ रोजी रात्री २३:३५ वाजता सुटणारी गाडी क्र. १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्स्प्रेस आता सुधारित वेळेनुसार २५.०६.२०२६ रोजी पहाटे ०३:३० वाजता सुटेल. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, नागरिकांनी आपला प्रवास नियोजित करण्यापूर्वी सुधारित वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search