Mumbai Local: सेकंड क्लासच्या तिकिटाला बनवले एसी तिकीट; प्रवाशाचा अजब कारनामा उघड.

   Follow us on        

Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या विरार-चर्चगेट मार्गावरील एसी लोकलमध्ये बनावट डिजिटल तिकिटाद्वारे प्रवास करण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दादरहून सुटलेल्या एसी लोकलमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक अरविंद कुमार हे तिकीट तपासणी करत असताना, एका प्रवाशाने त्याच्या पत्नी आणि मुलासह प्रवास करताना मोबाईलवर विरार-चर्चगेट परतीचे (रिटर्न) एसी तिकीट दाखवले. मात्र, अधिकृत रेल्वे अ‍ॅपच्या तुलनेत या तिकिटाचा फॉन्ट आणि लेआउट यामध्ये सूक्ष्म फरक आढळल्याने निरीक्षकांना संशय आला. त्यांनी तातडीने हँडहेल्ड मशीनद्वारे तिकीट क्रमांकाची पडताळणी केली असता, ते तिकीट प्रत्यक्षात एका द्वितीय श्रेणीच्या तिकिटाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने मूळ तिकिटाच्या क्रमांकाचा वापर करून मोबाईल स्क्रीनवर फेरफार केला होता.

​या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) शेख फैजल नावाच्या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने यूट्यूबवरील एका लिंकद्वारे रेल्वेच्या ‘रेलवन’ (Railone) अ‍ॅपसारखे हुबेहूब दिसणारे एक बनावट अ‍ॅप डाउनलोड केले होते. या अ‍ॅपमध्ये प्रवासाची तारीख, स्थानक, अंतर आणि प्रवाशांची संख्या यासारखी सर्व माहिती भरून हुबेहूब मूळ तिकिटासारखे दिसणारे बनावट तिकीट तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेने या फसवणुकीचे सर्व पुरावे गोळा करून वांद्रे रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अशा बनावट अ‍ॅप्सपासून सावध राहण्याचे आणि केवळ अधिकृत अ‍ॅपद्वारेच तिकीट खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search