Category Archives: मुंबई
Mumbai Local Train News : लोकलने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. गर्दीच्या वेळी लोकलला लटकत प्रवास टाळण्यासाठी व एका लोकल ट्रेनमधून अधिकाधिक प्रवाशांना आरामशीर प्रवास करता यावा, याकरता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा नव्या बदलासह रेल्वे धावणार आहेत.
उपनगरीय वाहतूक सेवा लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मदत मिळणार आहे. ४९लोकल ट्रेन १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या होणार आहेत. त्यामध्ये मुख्यपणे चर्चगेट ते विरार दरम्यानची स्लो लाइन आणि केवळ १५ फास्ट लाइन सेवांचा समावेश आहे.
खालील गाड्या उद्या १५ ऑगस्टपासून या बदलानुसार धावणार आहेत.
मुंबई: मुंबई येथून सुटणाऱ्या सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर या वंदे भारत गाड्यांना उद्या दिनांक ४ ऑगस्टपासून कल्याण आणि ठाणे येथे 2 मिनिटे थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
शिर्डी साईनगर एक्सप्रेस सीएसएमटीहून सुटल्यानंतर सकाळी ७.११ वाजता कल्याणला थांबेल. सीएसएमटीला परतताना ही गाडी कल्याणला रात्री ९.४५ वाजता थांबेल.
मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून सोलापूरसाठी निघाल्यानंतर दुपारी ४.३३ वाजता ठाणे स्थानकावर थांबेल. दुपारी ४.५३ वाजता कल्याणला पोहोचेल. परतीच्या प्रवासादरम्यान ती ठाणे येथे सकाळी 11.50 वाजता थांबेल.
मुंबई |दि.३०.०५.२०२३ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, नारायण देसाई फाऊंडेशन व मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले होते. या महोत्सवमध्ये बहुभाषिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी काही निवडक लघुपट प्रेक्षकांसाठी दाखविण्यात आले. या विनामूल्य लघुचित्रपट पाहण्याचा आनंद असंख्य मायबाप रसिक प्रेक्षकांनी घेतला. संपूर्ण थिएटर खचाखच भरले होते. महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह देवून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक संतोष रोकडे सर, सुप्रसि्दध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर, दिग्दर्शक आरयन देसाई, शिरीष राणे, दिलीप दळवी, सर्वणकर, सांडवे,इ. मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक तथा उपसचिव महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई संतोष रोकडे सरांनी शासकीय योजना तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या उपक्रमांची माहिती दिली. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर यांनी चित्रपट आणि लघुपट ई. विषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले.
महोत्सवाचे आयोजक, दिग्दर्शक आरयन देसाई यांनी सर्व मान्यवर व मायबाप रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीत नविन उपक्रम म्हणजेच मराठी चित्रपटांचा गौरव सोहळा “मातृभाषा चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा” सुरू करण्याचे जाहीर केले. सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात ७१ तिकीट दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त केली आहेत. अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही.
ई-तिकीट आणि खिडकी तिकिटांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकी नाका परिसरात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. १५ मे रोजी आरपीएफ आणि दक्षता विभागाचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने अलीम खान याच्याकडून १ लाख ३ हजार ९८५ किमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे ताब्यात घेऊन अंधेरी आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी केली असता अलीम खानने सोबत अफजल नफीस खान काम करीत असल्याचे सांगितले. अफजल नफीस खान खास २२ मे रोजी आरपीएफने ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
६३ गुन्हे दाखल
दलालांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने १ ते २७ मेदरम्यान आरपीएफने ७१ तिकीट दलालांवर ६३ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.
Mangos Rates Update : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत.
वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे.
मागील आठवड्यापासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
पूर्वी १०००-१२०० रुपये प्रति डझन एवढा भाव असलेला हापूस आता ६०० ते ८०० रुपयांत मिळत आहे.
Konkan Railway News – कोकण रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सीएसएमटी स्थानकावर घेण्यात येणार्या ब्लॉक मुळे मंगलोर जंक्शन ते सीएसएमटी, मुंबई दरम्यान धावणारी Majn Csmt Exp – 12134 गाडी 23 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान सीएसएमटी स्थानकापर्यंत न चालवता ती दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 तसेच 12 आणि 13 वर रेल्वेच्या माध्यमातून काही आवश्यक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या दोन लाईनवर ब्लॉक घेण्यात आले आहेत. त्यामुळे 23 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान काही गाड्यांची सेवा दादर स्थानकापर्यंत असणार आहे असे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.