होय ३५० वर्ष! ज्याने शिवकाळ अनुभवला, ज्याने दस्तुखुद छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास अनुभवला तो इतिहासाची साक्ष देणारा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराच्या परिसरातील व आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ अखंड ३५० वर्षापेक्षा जास्त निधड्या छातीने उभा असणारा अवाढव्य असा हो हो मावळाच म्हणावं लागेल असा वृक्ष म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या काळातील आंब्याचे झाड. याच आंब्याच्या ढोळी मध्ये शिवकालीन शस्त्र सापडली होती. या आंब्याला येणाऱ्या साखरे प्रमाणे गोड अंब्यामुळे पंचक्रोशीत या आंब्याच्या झाडाला साखरगोटी म्हणूनही ओळख होती.
उमरठ येथे येणाऱ्या प्रत्येक नरवीर प्रेमींनी हे आंब्याचे झाड आणि त्याच्या ढोलीत सापडलेली तलवार आणि दांडपट्टा पाहिला असेल.
गेले काही दिवस होणाऱ्या पावसा बरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने आज आज हा आंब्याचा वृक्ष कोलमडून पडला. सुदैवाने जवळपास कोणी नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतू स्मारक परिसराला असणाऱ्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा मावळा हरपल्याची भावना गावकरी व्यक्त करत आहेत…
साभार – सह्याद्रीच्या पाऊलखुणा
Vision Abroad