येत्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीत आपले नाव आणि मतदान केंद्र कसे चेक कराल?

Grampanchayat Election News :  राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. ह्या निवडणुकीसाठी आपण जर नवीन नाव नोंदणी केली असेल तर ते चेक करण्यासाठी तसेच मतदान केंद्रात बदल झाला आहे कि नाही हे चेक करता येण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तर्फे ऑनलाईन सुविधा उपल्बध करून देण्यात आली आहे.
त्यासाठी https://electoralsearch.in/ ह्या  लिंक वर क्लिक करा आणि खालील स्टेप फॉलो करा.
इथे तुम्हाला दोन पर्याय भेटतील. एक पर्याय म्हणजे पहचान-पत्र क्र. द्वारा खोज, ह्या पर्यायात आपल्याकडे मतदार ओळखपत्र नंबर असेल तर तुम्हाला इथे शोधता येईल. जर तुमच्याकडे हा नंबर नसेल तर आपले नाव , वय आणि इतर माहितीद्वारे आपली माहिती शोधू शकता. जेवढी जास्त माहिती तुम्ही इथे भराल तेवढे तुम्हाला तुमची माहिती शोधणे सोपे जाईल.
आपल्या नावाच्या समोरील VIEW DETAILS बटण वर क्लिक करून आपली डिटेल्स पहा
   
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search