पेण: आपल्या विविध मागण्याकरिता आणि पेण रेल्वे स्थानकात सध्याच्या गैरसोयी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून आणून देण्यासाठी माझं पेण आणि रेल्वे प्रवासी सन्मान समिती तर्फे पुढील महिन्यात ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
ह्या मागण्यांमध्ये मुख्य मागणी म्हणजे ह्या स्थानकाला काही गाड्यांचे थांबे मिळवणे हि असली तरी अजून काही मागण्या आहेत. पेण तालुका हा जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून त्याची लोकसंख्या सुमारे २ लाखापेक्षा जास्त आहे. पेण तालुक्यातून मुंबई,नवी मुंबई, पनवेल, माणगाव, रोहा आणि इतर ठिकाणी नोकरी, शिक्षण तसेच व्यापाराच्या कारणासाठी नियमित प्रवास करतात. त्याचप्रमाणे काही मोठ्या कंपन्या पण तालुक्यात आहेत. सुबक मूर्तीसाठी पेण तालुका पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. हे रेल्वे स्थानक मुंबई गोवा हायवे च्या जवळ आहे. ह्या सर्व गोष्टी अनुकूल असताना पेण ह्या रेल्वे स्थानकाला रेल्वे प्रशासनाकडून योग्य सन्मान भेटत नाही आहे अशी ह्या समितीची तक्रार आहे.
काय आहेत मागण्या ?
१. कोरोना पूर्व काळात पेण स्थानकात थांबणारी दिवा-सावंतवाडी-दिवा (१०१०५/१०१०६) ह्या गाडीला पेण, कासू, नागोठणे, रोहा येथे पूर्ववत थांबा मिळावा.
२. कोरोना काळात सामान्य Passenger गाडयांना लावलेले अधिक तिकीट दर पूर्ववत करण्यात यावेत.
३. रोहा – पनवेल – रोहा या मार्गावर मेमू गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि त्या नियमित वेळापत्रकानुसार असाव्यात.
४. पेण दिवा पेण मेमू शनिवार आणि रविवार देखील सुरु राहावी.
५ यादीतील किमान ५ एक्सप्रेस गाडयांना पेण येथे थांबा देण्यात यावा.
याचप्रमाणे स्थानकावर अतिरिक्त तिकीट खिडकी, तिकीट तपासणीस नेमण्यात यावा असे रेल्वेच्या हितासाठी काही मागण्या पण आहेत.
ह्या सर्व मागण्या दिनांक १०.१२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात नाहीतर दिनांक ११.१२.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा “माझं पेण” आणि “रेल्वे प्रवासी सन्मान समिती” ने दिला आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad