
Konkan Railway News 13/12/2022: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01430 एकेरी विशेष गाडी मडगाव जंक्शन येथून रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०८.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री २३.०० वाजता पोहोचेल.
ह्या गाडीचे थांबे
करमळी, थीविम, सावंतवाडी रोड,कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर.
डब्यांची रचना
१५ शयनयान (Sleeper Coach)आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण
या गाडीचे आरक्षण दिनांक 14 डिसेंबर पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर चालू होणार आहे.
या गाडीच्या अधिक माहितीसाठी www.enquiry indianrail.gov.in ह्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन कोकणरेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.
हेही वाचा : ग्रामपंचायत निवडणूक -२०२२! उमेदवार आणि मतदार यांना माहिती असाव्यात अशा महत्वाच्या काही गोष्टी.


Facebook Comments Box
Related posts:
Revas Reddy Coastal Highway: अजून दोन पुलांच्या बांधकामासाठीच्या निविदा उघडल्या; 'या' कंपनीने लावली ...
कोकण
Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर अजून २ गाड्या; एकूण ३२ फेऱ्या
कोकण रेल्वे
Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावर अडकलेल्या गाडय़ा मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात ...
कोकण