मुंबई :श्री सिध्दीविनायक गणपती मंदिरातील श्रीच्या मूर्तीला येत्या बुधवारी १४ ते रविवार १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना श्रींच्या मुर्तींच्या दर्शन घेता येणार नसून याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
Follow us on



श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाविकांना आवाहन करत बुधवार दिनांक १४ डिसेंबरपासून ते रविवारी दिनांक १८ डिसेंबर २०२२च्या कालावधीमध्ये श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या कालावधीमध्ये भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तींचे दर्शन बंद असेल, याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येईल असे श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
या सिंदूर लेपनानंतर सोमवार १८ डिसेंबरला दुपारी एक वाजल्यापासून नेहमीप्रमाण गाभाऱ्यातून भाविकांना श्रींच्या मूर्तींचे दर्शन घेता येईल,असे न्यासाने कळवले आहे.