Konkan Railway News : कोकणमधील गजानन महाराजांच्या भक्तांना एक खुशखबर आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागपूर मडगाव द्वि साप्ताहिक विशेष गाडीला आता शेगाव ह्या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. . कोकणातून शेगावला जाणाऱ्या भाविकांची मागणी या थांब्यामुळे पूर्ण झाली आहे.
01139/01140 हे नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावते. या गाडीला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी कोकण पट्ट्यातून शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेऊन रेल्वेने नागपूर -मडगाव विशेष एक्सप्रेसला दिनांक 4 जानेवारी 2023 पासून थांबा मंजूर केला आहे.
(हेही वाचा>वर्षाच्या सुरवातीला कोकणरेल्वे मार्गावर सहा विशेष फेऱ्या…)
गाडी क्रमांक 01140 ह्या गाडीची वेळ कुडाळ स्थानकावर रात्री 10:10 आहे ती दुसर्या दिवशी दुपारी 3:35 वाजता शेगावला पोहोचते आणि पुढे नागपूरला जाते.
गाडी क्रमांक 01139 ह्या गाडीची वेळ शेगाव स्थानकावर संध्याकाळी 07:23 आहे ती दुसर्या दिवशी दुपारी 12:36 वाजता कुडाळ स्थानकावर पोहोचते आणि पुढे मडगावला जाते.
ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यात आलेली होती आणि दोन वेळा वाढिव कालावधी पण देण्यात आला होता. आता ह्या गाडीचा कालावधी फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकणाला जोडणाऱ्या ही गाडी कायमस्वरूपी करावी अशी मागणी होत आहे.
(हेही वाचा>नागपूर-मडगाव गाडीच्या वाढिव फेर्यांचे आरक्षण उद्यापासून…. …)
Vision Abroad