Konkan Railway News : राज्यातील वाढणार्या थंडीचा परिमाण आता कोकण रेल्वे वर होऊ लागला आहे. कोकण रेल्वेमार्गावर मडगाव पेण नजीक काल सकाळी रेल्वे रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग थंडीमुळे तुटल्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परीणाम झाला होता. रेल्वे कर्मचार्याच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अपघात टळला.
(Also Read >हातिवली(राजापूर) येथील ग्रामस्थांना दिलासा….१२ किमी अंतरावरील वाहनांना टोलमाफी)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेणवरून पनवेलला जाणार्या रेल्वे रुळाला जिते ते आपटा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. शुक्रवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला. या मार्गावर रेल्वे जाण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना त्यांना सदर प्रकार सकाळी 6 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान आढळला. याबाबत रेल्वे कर्मचार्यानी रेल्वेच्या अधिकार्यांना तातडीने सूचित केले.
रेल्वे अधिकार्यांनी तातडीने सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी दिवा स्थानकातून सुटणारी रोहा-दिवा या मेमु रेल्वेला जिते रेल्वे स्थानकानजीक थांबविले. यानंतर मडगाव-नागपूर स्पेशल रेल्वे, पेण येथून सकाळी 6.45 ला सुटणारी पेण-दिवा मेमु रेल्वे व मँगलोर-मुंबई रेल्वे या चार गाड्यांना रोखण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. सकाळी 7.30 वाजता रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. 10 ते 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने सदर रुळावरून रेल्वे पुढे पाठविण्यात आल्या. थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रकार घडत असतात, अशी माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाकडून कडून देण्यात आली.
(Also Read >सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार)
Vision Abroad